गुहागर, दि.14 : मंगळवार दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खरे-ढेरे- भोसले महाविद्यालय (Khare-Dhere-Bhosle College) कार्यक्रम घेण्यात आला. श्री स्वामी समर्थ स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एम. इ. एस. ए. एम. परशुराम हॉस्पिटल एन्ड रिसर्च सेंटर घाणेखुंट यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व सक्षमीकरण शिबीर महाविद्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. दिप्ती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. Health camp in Khare-Dhere-Bhosle College
या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी घाणेखुंट लोटे यांची पूर्ण डॉक्टर टीम- डॉ. दिप्ती चव्हाण व त्यांचे विविध विभागातील तज्ञ सहकारी डॉक्टर, श्री स्वामी समर्थ स्वयंसेवी संस्था गुहागरच्या अध्यक्षा सौ. रश्मी पालशेतकर, ज्युडो कराटे प्रशिक्षिका सोनाली वरंडे आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. Health camp in Khare-Dhere-Bhosle College
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सौ.रश्मी पालशेतकर यांनी बचत गटांचा आढावा घेतला आणि सक्षमपणे कार्यक्षम काम करणाऱ्या श्रेयस बचत गट, आम्रपाली बचत गट, सखी बचत गट इ. गटांचा रजिस्टर व पुष्प देऊन सन्मानित केले आणि जगतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. Health camp in Khare-Dhere-Bhosle College
डॉ. सावंत सरांनी शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य स्थापन केल असल तरी स्वराज्याच्या जननी जिजामाताच आहेत. म्हणून पुढील पिढी संस्कारीत होण्यासाठी आजची महिला सक्षम, सुदृढ झाली पाहिजे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. Health camp in Khare-Dhere-Bhosle College
प्रमुख वक्त्या डॉ. दिप्ती चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांचे आरोग्य, मासिक पाळीच्या वेळी घेण्यात येणारी काळजी, स्वच्छता, आहार पर्यावरणाच्या अनुषंगाने वॅाशेबल सॅनेटरी पॅड याची माहिती दिली. मुलींमध्ये सध्या जाणवणारे P.C.O.S.,थॉयरोइड, अॅनिमिया यांची कारणमीमांसा केली. आणि हे आजार टाळण्यासाठी चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. जागतिक महिला दिनाची जागतिक संकल्पना येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता ही स्पष्ट करून सांगितली..शिवाय महिलांना आपल्या परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले. जंकफूड टाकून चौरस व सकस आहाराचा अवलंब केलाच पाहिजे असा आग्रह धरला. P.P.T. माध्यमातून आपल्या ओघवत्या शैलीत अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले. Health camp in Khare-Dhere-Bhosle College
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षांच्या प्रा.रश्मी आडेकर यांनी केले. या प्रसंगी NSS चे कार्यक्रम अधिकारी प्रा.पाटील, प्रा. अनिल हिरगोंड, शीतल मालवणकर इतर प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बचत गटाच्या बहुसंख्य महिला व महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शीतल मालवणकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. Health camp in Khare-Dhere-Bhosle College