प्रथमेश शिर्केचा पुढाकार, टीडब्लुजे हेल्थकेअरचे सहकार्य
गुढे, ता. 18 : Health Camp in Gudhe टीडब्लुजे फाऊंडेशनच्या आरोग्य विभागाच्या (TWJ Health Care) सहकार्याने प्रथमेश शिर्के यांनी गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर घेतले. या शिबिराचा लाभ गुढे गावातील 50 ग्रामस्थांनी घेतला. यावेळी काही रुग्णांना आवश्यक औषधे मोफत पुरविण्यात आली तर सुमारे 20 रुग्णांना अधिक तपासणीसाठी रामपूर आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिला.


Health Camp in Gudhe
गुढेमधील ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम रहावे. मधुमेह, रक्तदाब यासारखा आजार असेल तर तो रुग्णांना कळावा. अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी प्रथमेश शिर्के या तरुणाने आरोग्य शिबिराचा अभिनव उपक्रम गुढे परटवणेवाडीत राबविला. या उपक्रमासाठी टीडब्लुजे फाउंडेशनच्या आरोग्य विभागातील (TWJ Health Care) वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश झिर्मिले, डॉ. श्रद्धा जाधव, नर्स अपर्णा जाधव व श्वेता जाधव उपस्थित होते. त्यांना गुढे गावातील आशा सेविका मंगल मोरे, वैजयंती पवार, अश्र्विनी साळवी यांनी सहकार्य केले. गुढे मधील 30 महिला व 20 पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजार असलेल्या ग्रामस्थांना टीडब्लुजे फाऊंडेशनच्या वतीने मोफत औषधे देण्यात आली. या तपासणीमधील 20 रुग्णांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी रामपूर आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. Health Camp in Gudhe


या शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ प्रविण तांबे यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच संजय कदम, केदार जोगळे, रविंद्र शिर्के, संचित कदम, शांताराम कदम, प्रविण तांबे, सुखदेव नलावडे उपस्थित होते. आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रथमेश शिर्के यांना संदेश बोबाले, साई थरवळ, सुजल थरवळ, रोहित काटकर व रामपूर जिल्हा परिषद गटाचे सचिव गुरूराज वंजारे यांनी सहकार्य केले. Health Camp in Gudhe
Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर, Health Camp in Gudhe, TWJ Health Care,