स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभिनयान अभिनयानाअंतर्गत आयोजन
गुहागर, ता. 17 : गुहागर ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभिनयानाअंतर्गत दिनांक २५ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. Health camp at Guhagar Rural Hospital

या शिबिरात गरोदर स्त्रियांची मोफत सोनोग्राफी, बालरोगतज्ञ, स्त्री रोग तज्ञ, फिजिशियन, सर्जन, दंतशल्य चिकित्सक, मानसोपचार तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, नेत्र तज्ञ, आयुष तज्ञ,अस्थिरोग तज्ञ, मोफत रक्त लघवी तपासणी, एक्स रे, इसीजी,कॅन्सर स्क्रीनिंग करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बलवंत यांनी सांगितले. तसेच पाच लाखांच्या मोफत आरोग्य विमा साठी आवश्यक असणारे आयुष्मान कार्ड व वय वंदना कार्ड काढून मिळणार आहे. यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल आणणे आवश्यक आहे. तसेच सर्व रुग्णांनी आधार कार्ड घेऊन यावे, असे आव्हान त्यांनी केले आहे. Health camp at Guhagar Rural Hospital