संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील आबलोली येथील मुंबई पोलिस दलातील हेडकॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार यांचे बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:३० वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. निधना समय त्यांचे वय ५१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहिण, भाऊ, भावजय, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. Head Constable Pramod Pawar is no more

दिवंगत प्रमोद गंगाराम पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात तन मन धनाने स्वत:ला झोकून देणारे बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र.५० आबलोली या धम्म संघटनेचे सल्लागार तसेच आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली या धम्म संघटनचे विश्वस्त आणि पाऊल निर्मित नाट्य संस्था आबलोली मुंबई या नाट्य संस्थेचे कलाकार, दिग्दर्शक, दानशूर व्यक्तीमत्व होते. Head Constable Pramod Pawar is no more
दिवंगत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार यांचा पुण्यानुमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आज सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक ५० आबलोली या संघटनेच्या वतीने पार पडला. Head Constable Pramod Pawar is no more
