गुहागर, ता. 18 : श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा’ दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सौ सुजाता कांबळे मॅडम यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले. तसेच कला शिक्षिका सौ पाकळे मॅडम यांनी योग्य पद्धतीने हात कसे धुवावेत याचे विद्यार्थ्याना प्रात्यक्षिक करुन दाखवले. “Hand Wash” Day at Guhagar High School
माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. बहुतांश वेळेला माणूस आपल्या हाताने अन्नाचे सेवन करतो.अशावेळी, हात स्वच्छ नसतील तर माणूस स्वतःच अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. परिसरात, आजूबाजूला अनेक ठिकाणी असंख्य जिवाणू असतात. आपण विविध काम करत असताना ते आपल्याही नकळत हाताला चिटकलेले असतात. अन्न खाण्यापूर्वी आपण हात स्वच्छ धुतले नाही तर हेच जिवाणू आपल्या पोटात जातात. आपण आजारी पडतो. यावरून आपल्या लक्षात येते की हात धुणे ही मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. “Hand Wash” Day at Guhagar High School
हात केव्हा धुवावेत ?
1.खोकल्यावर अथवा शिंकल्यावर
2.स्वयंपाक करण्यापूर्वी व स्वयंपाक केल्यानंतर
3.जेवण्यापूर्वी आणि जेवल्यावर
4.आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी
5.शौचालयाला जाऊन आल्यानंतर
हात कसे धुवावेत ?
1. आपले हात पाण्याने ओले करा.
2. आपल्या हातांना साबण लावा.
3. आपले तळवे एकत्र घासून घ्या.
4.आपले हात एकमेकांवर घासून घ्या.
5.आपले बोटे एकमेकांत (बेचक्यात) घालून घासा
6. आपले अंगठे घासून घ्या.
7. तळहातांवर बोटांची टोके घासा.
8. साबणाचा फेस पूर्ण निघून जाऊपर्यंत हात स्वच्छ धुवा.
9. स्वच्छ रुमाल किंवा टॉवेलचा वापर करून आपले हात स्वच्छ धुवा.
या ‘हात धुवा दिन’ कार्यक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे सर , पर्यवेक्षिका सौ सुजाता कांबळे मॅडम, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर उपक्रम गुहागर एज्युकेशन सोसायटीचे CEO व शाळा समिती अध्यक्ष मा श्री दिपकजी कनगुटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. “Hand Wash” Day at Guhagar High School
