संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत गुरुपौर्णिमा व व्यास पौर्णिमा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे शृंगारतळी शाखा व्यवस्थापक श्री नयनेश शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे, प्रसिद्धी विभाग प्रमुख एस.एम. आंबेकर, विज्ञान शिक्षक के.डी शिवणकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. Guru Purnima at Patpanhale School


पाटपन्हाळे विद्यालयातर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्त मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. महर्षी व्यास व सरस्वतीदेवी यांच्या प्रतिमांचे कार्यक्रमाध्यक्षा व मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण, स्टेट बँक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखा व्यवस्थापक नयनेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाध्यक्षा व मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी घाणेकर हिने व प्रास्ताविक कस्तुरी वझे – ८वी यांनी केले. स्टेट बँक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखा व्यवस्थापक नयनेश शिंदे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. Guru Purnima at Patpanhale School


पूर्वा जाधव, आदित्य भिंगारे, अभिज्ञा पवार – इयत्ता पाचवी, प्रीती राठोड – इयत्ता सहावी, सावनी दीक्षित, मधुरा शेलार, श्रीराम भिडे , ऋतुजा भिडे – इ. सातवी , रिद्धी धामणस्कर , स्वरा बारे , श्रीया धुमक , नवशिन नदाफ , विणा देसाई , वेदांत धुमक , अथर्व राठोड – इ.आठवी व देवयानी घरट – इ.दहावी या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे यांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्षा व मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा हेतू , गुरूंचे महत्त्व यांबद्दल मार्गदर्शन केले व कार्यक्रम संपन्न करणाऱ्या इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांचे व मनोगत व्यक्त करणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शार्दुल ओक – इयत्ता आठवी याने मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Guru Purnima at Patpanhale School