गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘गुरूपोर्णिमा’ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रा. सौ. रश्मी आडेकर व प्रा. श्री. विराज महाजन प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. Guru Purnima at Guhagar College
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शर्वरी देवकर हिने केले. या वयामध्ये जडणघडणीच्या काळात गुरूपोर्णिमेसारखे कार्यक्रम कसे गरजेचे आहेत आणि ते का करावेत हे आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. गुरुपोर्णिमेबद्दल माहिती कु. दिप्ती घाडी, कु. कार्तिक कुळे, कु. नेहा पवार, यांनी गुरूविषयची माहिती, गुरूंचे स्थान, आजच्या काळात शिक्षक व त्यांचे योगदान मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने गुरुंचे पूजन केले. प्रा. अजित देशपांडे, प्रा.मनाली बावधनकर, प्रा. सोंदेकर सर, प्रा. भरत कदम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. रश्मी आडेकर मॅडम यांनी भारतीय परंपरेने चालत आलेली गुरू-शिष्य परंपरा यांचे महत्व विषद केले. संत, गुरू आणि भगवंत यामध्ये गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले. Guru Purnima at Guhagar College


प्रा. महाजन सर यांनी कॉलेजमध्ये गुरुपोर्णिमा साजरी करता ही विशेष आणि कौतुकाची बाब आहे. आजच्या शिक्षण पद्धतील शिक्षक हा गुरु स्थानी आहे. शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे यानी जीवनात प्रत्येक टप्प्यावर गुरू किती महत्त्वाचा असतो. हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. Guru Purnima at Guhagar College


या कार्यक्रमाचे अध्यक्षपद, प्रशाळेचे पर्यवेक्षक श्री.मधुकर गंगावणे यांनी भूषविले. जीवनामध्ये शिवाजी महाराजांना गुरू मानून त्यांनी दर्शवलेल्या वाटेवर निरंतर चाला असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार कु. अद्वैत काणेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कु. यश झिंबर ,रुद्राक्ष संसारे, मनाली शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मदत केली. Guru Purnima at Guhagar College


या कार्यक्रमासाठी प्रा. मेटकरी सर,प्रा. दिपाली माळी, प्रा. वैद्य सर, प्रा.वृषाली मर्गज , प्रा. रिया पालशेतकर, प्रा.संपदा भाटकर, प्रा. नवरंग पाटील , प्रा. प्रकाश अनगुडे, प्रा.विद्या चव्हाण प्रा. जयश्री बाणे, प्रा.परमेश्वर कटरे व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सोनल महाजनव कु. अनुष्का पंगेरकर यांनी केले. Guru Purnima at Guhagar College