गुहागर, ता. 19 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह दरम्यानचा शिल्लक राहिलेला ० ते १.८०० च्या डांबरीकरण कामाला गती प्राप्त झाली असून या कामासाठी राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून २ कोटी रुपये निधी मंजूर झाले आहेत. Guhagar-Vijapur National Highway asphalting
गेले अनेक वर्षे सदरचे काम रखडले होते, अनेक वर्षे या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहन चालक तसेच प्रवासी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गुहागर शहर तसेच गुहागर तालुका वासियांच्यावतीने उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना देखील निवेदन सादर करून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. अखेर पालकमंत्र्यांनी त्वरित निधी देऊन या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. Guhagar-Vijapur National Highway asphalting
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि बाजारपेठ नाका येथे रस्ता रुंदीकरणसाठी गुहागर शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक परचुरे तसेच सर्व सहकारी व गुहागरवासीय यांनी दोन ते तीन वेळा उपोषणाचा मार्ग पत्करला होता. त्यांच्याही प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे. एकंदरीत गुहागर शहरवासीय तसेच तालुकावासीय यांच्या प्रयत्नाने या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. Guhagar-Vijapur National Highway asphalting
