अध्यक्षपदी प्रकाश झगडे तर सचिवपदी प्रविण रहाटे बिनविरोध
गुहागर, ता.15 : तालुका तेली समाज (Teli Samaj) सेवा संघाची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही सभा पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ( शृंगारतळी) येथे पार पडली. ही सभा तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी प्रकाश झगडे तर सचिवपदी प्रविण रहाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Guhagar Teli Samaj announces new executive committee
या सभेची सुरुवात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या सभेला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, प्रकाश झगडे, अनिल रहाटे, विजय रहाटे, विनायक लांजेकर, दिव्या किर्वे, एकनाथ रहाटे, मदन जाधव, गोपाळ झगडे, विश्वनाथ रहाटे, हरीचंद्र रहाटे, गणेश लांजेकर आदी उपस्थित होते. Guhagar Teli Samaj announces new executive committee
या सभेत इमारत बांधकाम संदर्भात चर्चा करण्यात आली. इमारत बांधकाम कुठच्याही शासकीय निधीतून न करता समाज बांधवांच्या योगदानातून करण्यात यावी त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सन २०२१- २२ ते २०२६ – २७ करिता कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी प्रकाश झगडे (अडुर), उपाध्यक्ष गजानन जाधव (मळण), खजिनदार पदी विश्वनाथ रहाटे (गुहागर), सचिव पदी प्रविण रहाटे (गुहागर), सहसचिव पदी गणेश किर्वे (वरवेली) तर सदस्य पदी सुहास रहाटे (वेळब), अशोक रहाटे (पालपेणे), सुधाकर रहाटे (जानवले), प्राची पवार (गुहागर), रोहिणी रहाटे (पालपेणे), अस्मिता झगडे (अडुर), दिव्या किर्वे (वरवेली), अनिल राऊत (वेळब), राजेन्द्र राऊत( वेळब), संदीप राऊत (पाटपन्हाळे) , संदिप महाडीक (आबलोली), गणेश लांजेकर (झोंबडी), सुरेश महाडीक( पेवे खरेकोंड), नितीन रहाटे तर सल्लागार पदी एकनाथ रहाटे (गुहागर), शशिकांत पवार (आबलोली ), मदन जाधव (मळण ), शशिकांत रहाटे (पालशेत), गोपाळ झगडे (अडूर), शाम रहाटे (जानवळे), संजय रहाटे,( वेळब) आदींची निवड करण्यात आली. Guhagar Teli Samaj announces new executive committee
नूतन कार्यकारिणी सदस्यांचा माजी अध्यक्ष शशिकांत पवार यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष प्रकाश झगडे म्हणाले, नवीन कार्यकारिणीला तालुक्यातील समाज बांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे. पुढील काळात समाजाला अपेक्षित असणारे काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. Guhagar Teli Samaj announces new executive committee