गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उद्घाटन
Guhagar News : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग व शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे शृंगारी उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे सुपुत्र नोबेल पुरस्कार विजेते जैव रसायन शास्त्रज्ञ डॉ. हरगोविंद खुराना जन्म शताब्दी वर्षानिमित्त ५० वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान नगरी शृंगारी उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय शृंगारतळी येथे दि. ६ व ७ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. Guhagar Taluka Level Science Exhibition
Guhagar Taluka Level Science Exhibition
शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. रत्नागिरीचे प्राथ- शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, माध्य. शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत, गुहागरच्या तहसिलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, शृंगारी एज्युकेशन सोसायटी अब्बास कारभारी, सेक्रेटरी रमजान साल्हे, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष रविंद्र इनामदार तसेच विशेष उपस्थिती म्हणून अंतराळवीर आरती पाटील (Astronaut Aarti Patil) या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शब्बीर बोट असणार आहेत.
शुक्रवार दि ६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. विज्ञान दिंडी, शोभायात्रा, सकाळी १०.३० वा. उद्घाटन, दुपारी १२.३० वा. परिक्षण व प्रदर्शन पाहण्यास खुले, दुपारी २ वा. अंतराळवीर आरती पाटील यांचे व्याख्यान ,शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० वा. प्रश्नमंजुषा दुपारी २.३० वा. बक्षिस वितरण व समारोप बक्षिस वितरण व समारोप होईल. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे सहा.पो. नि. तुषार पाचपुते, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. Guhagar Taluka Level Science Exhibition
कोरोना काळानंतर होणारे हे विज्ञान प्रदर्शन होत असल्याने विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे गुहागर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांचा या प्रदर्शनात सहभाग असणार असुन या विज्ञान प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांसह नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन गुहागर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांनी केले आहे. Guhagar Taluka Level Science Exhibition