असगोलीत पुलावरील डांबर उखडले, असगोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी
गुहागर, ता. 16 : शनिवार 14 रोजी सायंकाळी दोन तास झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीचा फटका पालशेत आणि असगोली गावाला बसला. पालशेत सावरपाटी येतील 8 घरात पुराचे पाणी शिरले. पाचमाड परिसरातील घरांमध्येही पाणी शिरले. असगोलीकडे जाणाऱा सखल भागातील रस्ता पाण्याखाली गेल्याने काहीवेळ वहातूक बंद झाली. असगोली खारवीवाडीतील नाल्याला आलेल्या महापूराने पुलावरील डांबर पूर्णपणे उखडून टाकली आहे. Guhagar taluka is the worst hit by rains


यावर्षी पावसाचा सर्वाधिक फटका गुहागर तालुक्याला बसताना दिसून येत आहे. 12 जून रोजी झालेल्या पावसाने नरवणमधील जनजीवन विस्कळीत केले होते. आज (14 जून) दुपारी 3 तासात पावसाने गुहागरला झोडपले. पालशेत, वरवेली, असगोली, गुहागर या भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने नदीनाले वेगाने प्रवाहित झाले. असगोली खारवीवाडीतील नाल्यात इतक्या वेगाने पाणी आले की, नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजुची जमीन खचली, पुलावरील सर्व डांबर उखडून गेले. पाण्याला वेग होताच त्याचबरोबर पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली. या पाण्याबरोबर एक झाड वहात येवून खारवीवाडीतील पुलाजवळ अडकले. नाल्याला आलेला पूर इतका मोठा होता की खारवीवाडीतील रस्त्याच्या दुतर्फा 10 ते 12 फुटापर्यंत पाणी पसरले. नाल्याशेजारील पालशेतकरांच्या घराला पाण्याने वेढले होते. Guhagar taluka is the worst hit by rains


हा नाला खारवीवाडीतून पुढे हनुमान मंदिराजवळ समुद्राला मिळतो. या रस्त्यालगत असलेल्या संतोष (नथुराम) पावसकर यांच्या घराच्या मागच्या बाजुला नाल्यालगत घातलेला बांधही पुराच्या पाण्याने उध्वस्थ झाला. पाण्याला इतका वेग होता की बांधाचे चिरे पावसकर यांच्या घरामागे इतस्त:त पसरले होते. Guhagar taluka is the worst hit by rains
गुहागरकडून असगोलीत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सखल भागात शेती आहे. ही सर्व शेती पाण्याखाली गेली होती. तेथील रस्ता देखील काही काळ पाण्याखाली गेला होता. या पाण्यालाही वेग असल्याने काही काळ वहातूक ठप्प झाली होती. Guhagar taluka is the worst hit by rains


पालशेत, वरवेलीमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. या पर्जनवृष्टीमुळे वरवेली शाळेजवळ दरड कोसळली. पाटपन्हाळे येथील एका घराचा बांध कोसळला. पालशेत आगडी मंदिर जवळ राकेश जाक्कर यांच्या घराजवळाचा बांध कोसळला. तसेच पालशेत सावरपाटी व पालशेत पाच माड परिसरात 14 ते 15 घरामंध्ये पाणी शिरले. 5 ते 6 दुकानांमध्येही पाणी शिरले होते. सायंकाळी 6 च्या सुमारास पाऊस थांबल्यावर पुराचे पाणी ओसरले. मात्र घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांनी तातडीने पालशेतमधील पूरस्थितीची पहाणी केली. पाणी शिरलेल्या घर आणि दुकानांमध्ये जावून पहाणी केली. Guhagar taluka is the worst hit by rains


तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली वेगाने काम सुरू आहे. रस्त्यावरील दगड, माती हटविण्यात आली आहे. आता उतारावर भूमिगत वाहिन्यांसाठी खणलेले चर बुजविण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. 13 जूनला ठेकेदाराचा महिला प्रतिनिधी अधिकाऱ्यांसमवेत दोन तास नरवण गावात उपस्थित होत्या. त्यावेळी अत्यंत गोड बोलून हे सर्व काम करुन देऊ असे या महिला प्रतिनिधीने सरपंच व अन्य ग्रामस्थांना सांगितले. तेव्हापासून या महिला प्रतिनिधी नरवण गावातून गायब झाल्या आहेत. बांधकामचे अधिकारी, कर्मचारी यांनी 13 जूनला रात्री दोनवाजेपर्यंत काम करुन रस्ता वहातूकीसाठी मोकळा केला. Guhagar taluka is the worst hit by rains