तालुक्यातील 12 पैकी 10 विद्यालयांचा 100 टक्के निकाल
गुहागर, ता.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यात गुहागर तालुक्याचा 99.47 टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील 1343 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 12 विद्यालयापैकी 10 विद्यालयांचा 100 टक्के निकाल लागला आहे. Guhagar SSC Result


गुहागरच्या श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातील 194 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमाक : मुद्रा वीरेंद्र चौगुले, गुहागर (96.40 टक्के), द्वितीय क्रमांक : श्रुती संदेश पाटणे, मोडकाआगर (95.80 टक्के), तृतीय क्रमांक : तन्वी राजेंद्र बाणे, श्रुंगारतळी व गौरी प्रल्हाद विचारे, वरवेली (95.20 टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाले.


चंद्रकांत बाईत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेला 62 विध्यार्थी बसले होते. हे सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत प्रथम क्रमांक कु. रेपाळ ज्ञानदा दिपक (98 टक्के), द्वितीय क्रमांक कु. गोरीवले सेजल चंद्रकांत (93.80 टक्के), तृतीय क्रमांक पांचाळ अभय सुधीर (92.60 टक्के) गुण मिळवून यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बाईत व मुख्यकार्यकरी अधिकारी सचिन बाईत यांनी अभिनंदन केले. Guhagar SSC Result
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरीआगरचाही 100 टक्के निकाल लागलेला आहे. परीक्षेला 12 विद्यार्थी बसले होते. हे सर्व ऊत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक पार्थ संदीप सपकाळ (90.60 टक्के) , द्वितीय क्रमांक समीक्षा अनंत मालप (87.80 टक्के), तृतीय क्रमांक कृपा प्रकाश रामाणे (86.60 टक्के) गुण मिळवत सुयश संपादन केले.


अंजनवेल येथील दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेला बसलेल्या 43 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले आहेत. गेली अनेक वर्षे या विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागण्याची परंपरा आहे. यात प्रथम क्रमांक रिया अनिल घडशी (90.20 टक्के), द्वितीय क्रमांक सिद्धी कृष्णा लवंडे (88.20 टक्के), तृतीय क्रमांक जानव्ही संजय घरट (87.80 टक्के) गुण प्राप्त केले आहेत.
पालशेत येथील श्रीमती आर. आर. पालशेतकर विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या 115 विद्यार्थी पैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेत प्रथम क्रमांक संयुक्ता प्रदीप रामाणे (96.40 टक्के), द्वितीय अमृता सुनील कणसे ( 96 टक्के), तृतीय क्रमांक सारंग बाळासाहेब ढेरे (94.20 टक्के) गुण मिळवत यश संपादन केले.


न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाटपन्हाळेचा 95.92 टक्के निकाल लागला आहे. 147 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक श्रावणी सुजित गमरे ( 89.20 टक्के), द्वितीय आर्या प्रकाश विचारे ( 86 टक्के), तृतीय क्रमांक वेदांत सतीश मेस्त्री (85.60 टक्के) गुण मिळवले आहेत. तसेच न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे इंग्लिश मिडियमचा 100 टक्के लागला आहे. परीक्षेला 19 विद्यार्थी बसले होते. प्रथम क्रमांक प्रथमेश गणेश खैरे (94.80 टक्के), द्वितीय स्नेहा प्रवीण ओक (91.60 टक्के), तर साहिल युनूस धामणस्कर (91.20 टक्के) गुण प्राप्त केले आहेत. Guhagar SSC Result


न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा 100 टक्के निकाल लागला असून परीक्षेला 76 विद्यार्थी बसले होते. यात प्रथम क्रमांक चिराग सचिन साळवी ( 88.80 टक्के), द्वितीय ओंकार शिवराम साळवी (83.40 टक्के), तृतीय क्रमांक नुपूर दत्ताराम धनावडे (82.60 टक्के), चतुर्थ क्रमांक श्रुतिका काशीनाथ मुरमुरे (80 टक्के) तर पाचवा क्रमांक पार्थ प्रसाद गिजे (79.60 टक्के) गुण मिळवून यश संपादित केले आहे.


शृंगारी उर्दू हायस्कूलचा निकाल 97.87 टक्के लागला आहे. 47 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक सामिया मुस्तफा साल्हे ( 95 टक्के), द्वितीय कैस युनूस केळकर (93.60 टक्के), तृतीय क्रमांक इकरा बशीर मुल्लाजी (91.60 टक्के ) गुण मिळवत हायस्कूलमध्ये यश प्राप्त केले. तसेच तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वरचा 100 टक्के निकाल लागला आहे. माध्यमिक विद्यालय मुंढरचा निकाल 100 टक्के, श्री पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय, शीरचा 100 टक्के, माध्यमिक विद्यालय काजुली 100 टक्के निकाल लागला आहे. Guhagar SSC Result