भाग्यवान महिलेला मिळणार पैठणी
गुहागर, ता. 24 : खालचापाट येथील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाचे रविवार दिनांक २८ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवस चालणाऱ्या उत्सव कालावधीमध्ये दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव कालावधीमध्ये श्री वराती देवीचे दर्शन घेणाऱ्या एका भाग्यवान महिलेला लॉटरी पद्धतीने प्रत्येक दिवशी पैठणीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी नितीन गोयथळे व अजित मोरे यांनी केले आहे. Guhagar Shri Varati Devi Navratri Festival

रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री वराती देवीची षोडशोपचारे पूजा, सकाळी ९ वाजता नवचंडी पाठ वाचन, सायंकाळी ५ वाजता सुरभी महिला भजन मंडळ गुहागर खालचा पाट यांचे भजन, सायंकाळी ७.१५ वाजता श्री वराती देवीची आरती, सायंकाळी ७.४५ वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ गुहागर वरचापाट यांचे भजन, रात्री १०.३० वाजता श्री वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळ साकेडी तालुका कणकवली यांचे भजन,
सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री वराती देवीचे षोडशोपचारे पूजा, सकाळी ९ वाजता कुंकू मार्जन व देवीची आवर्तने, सायंकाळी ५ वाजता श्री दुर्गा श्री भजन मंडळ गुहागर वरचा पाट यांचे भजन, सायंकाळी ७.१५ वाजता श्री वराती देवीची आरती, ७.४५ वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री ९ वाजता श्री नूतन गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ गुहागर खालचा पाट जांगळेवाडी यांचे भजन, रात्री १० वाजता श्री जांभळादेवी प्रासादिक भजन मंडळ गुहागर बाग यांचे भजन, रात्री ११ वाजता श्री दत्त प्रासादिक देवकर भजन मंडळ आरे यांचे भजन.
मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री वराती देवीची षोडशोपचारे पूजा, सकाळी ९ वाजता कुमारीका पूजन व सुवासिनी पूजन, सायंकाळी ४ वाजता श्री कलावती आई भजन मंडळ गुहागर यांचे भजन, सायंकाळी ७.१५ वाजता श्री वराती देवीची आरती, सायंकाळी ७.४५ ते ९ वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री ९ वाजता श्री माऊली महिला भजन मंडळ जाणवळे वाणेवाडी यांचे भजन, रात्री १० वाजता श्री माऊली वरदान देवी कलापथक रानवी यांचे जाकडी नृत्य, रात्री ११ वाजता स्वयंप्रकाश गोयथळे भजन मंडळ गुहागर खालचापाट यांचे भजन.
बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता वराती देवीची षोडशोपचारे पूजा, सकाळी ७.४५ वाजता सप्तशती पाठहवंन व पूर्णाहुती दुपारी १ ते ३ वाजता देवीचा महाप्रसाद, सायंकाळी ७.१५ वाजता श्री वराती देवीची आरती, सायंकाळी ७.४५ ते ९ वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता आई नवलाई प्रासादिक भजन मंडळ हेदवतड यांचे भजन, रात्री १०.३० वाजता अंतराळदेवी नाच मंडळ कानरकोंड यांचे गोफनृत्य, गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता श्री वराती देवीची षोडशोपचारे पूजा, सायंकाळी ७.१५ वाजता श्री वराती देवीची आरती, रात्री ८.१५ वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री १० वाजता श्री गंगामाता प्रासादिक बालमित्र भजन मंडळ कोंड कारूळ यांचे भजन, रात्री ११.१५ वाजता श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ पालशेत यांचे भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Guhagar Shri Varati Devi Navratri Festival