• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर महसूल विभागाची कारवाई

by Ganesh Dhanawade
March 19, 2022
in Guhagar
18 0
0
Guhagar Revenue Department Action
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टिंबलो शिपयार्डने जमीन कर थकविल्याने मालमत्ता जप्त

गुहागर, दि.19 :  तालुक्यातील साखरी–त्रिशूळ मोहल्लावाडी, म्हस्करवाडी येथील क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेल्या टिंबलो शिपयार्ड प्रा. ली. (Timblo Shipyard Pvt. LTD) या कंपनीने २०२१-२२ या वर्षाचा २ लाख ९८ हजार ५४७ रुपयांचा जमीन महसूल कर थकवल्याने गुहागर महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांनी दिलेल्या आदेशानुसार कंपनीचे कार्यालय व आवाराला असलेल्या गेटला सील ठोकण्यात आले आहे. Guhagar Revenue Department Action


साखरी-त्रिशुळ येथील मोहल्लावाडी, म्हस्करवाडी याठिकाणी टिंबलो शिपयार्ड कंपनीचा जहाज बांधणीचा प्रकल्प होता. याठिकाणी जहाज बांधणी होत असे. परंतु, काही वर्षे हा प्रकल्प पूर्णत: बंद आहे. या कंपनीने येथे घेतलेल्या २५ एकर २६ गुंठे या क्षेत्राचा वापर औद्योगिक कारणाकरिता केला असल्याने कंपनीने येथील जमीन महसूल कर भरणे आवश्यक होते. २०२१-२२ या वर्षाचा जमीन महसूल कर २ लाख ९८ हजार ५७४ इतका महसूल विभागाच्यावतीने आकारण्यात आला आहे. Guhagar Revenue Department Action

गत वर्षापर्यंत या कंपनीने जमीन महसूल कर भरला होता. परंतु यावर्षीचा कर अद्याप भरलेला नाही. कर भरण्याकरिता महसूल विभागाच्यावतीने वारंवार नोटीस देण्यात आल्या आहेत. सदरील कर भरण्याकरिता १० मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु कंपनीने कर भरला नाही. अखेर जमीन महसूल कर वसुली करिता गुहागर महसूल विभागाच्या वतीने कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करून ती सील करण्याची तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. Guhagar Revenue Department Action

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ (ड) प्रमाणे कंपनीने जमीन महसूल कर भरण्यास टाळाटाळ केली असल्याने स्थावर मालमत्ता कलम १८२ अन्वये कंपनीची मालमत्ता जप्त करून बुधवारी कंपनीचे कार्यालय आणि मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे. Guhagar Revenue Department Action

मंडल अधिकारी शशिकांत साळुखे, तलाठी हनुमंत भिसे यांनी कंपनीला सील ठोकण्याची कारवाई केली. थकलेल्या कराच्या रकमेचा बोजा कंपनीच्या सातबाऱ्यावर चढवण्यात येणार असल्याचे मंडल अधिकारी शशिकांत साळुखे यांनी सांगितले. Guhagar Revenue Department Action

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar Revenue Department ActionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTehsildar Pratibha VaraleTimblo Shipyard Pvt. LTDटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.