गुहागर, ता. 13 : गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम गुहागर पंचायत समिती सभागृह येथे पार पडला. या पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या देखरेखीखाली तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. Guhagar Panchayat Samiti Reservation
यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जीवन शिक्षण शाळा नं. 1 चा विद्यार्थी श्लोक वैभव तुलसूणकर याच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीमध्ये पाचेरीसडा पंचायत समिती गण मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शृंगारतळी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, मळण पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, शीर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, असगोली पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, अंजनवेल पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, कोंड कारूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण अनारक्षित, पडवे पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, तळवली पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, वेळणेश्वर पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. Guhagar Panchayat Samiti Reservation

दरम्यान, अनेक पंचायत समिती गणांमध्ये मध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले आहे. तर काही पंचायत समिती गणमध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आतापासूनच महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. असगोली व अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षाना महिलांची शोधाशोध करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी सदस्य पदांसाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल, अशी ही स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारण अनारक्षित पडलेल्या कोंड कारूळ, पडवे, तळवळी, वेळणेश्वर चारी गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार हे निश्चित आहे. Guhagar Panchayat Samiti Reservation