वर्धापन दिनानिमित्त आलेल्या अनमोल शुभेच्छा
जय श्रीकृष्ण 🙏💐
आपले गुहागर न्यूज चे वर्धापन दिनाला रत्नागिरी बळीराज सेनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐💐💐💐 आपण करीत असलेल्या पत्रकारितेच्या रूपाने गुहागर चे नाव जागतिक पातळीवर पोहचविण्या चे महान कार्य प्रामाणिकपणे करीत आहात. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
-पराग कांबळे, जिल्हा अध्यक्ष, बळीराज सेना 8390751769
आपलं गुहागर न्यूज चॅनल चालू होऊन आज पाच वर्षे झाली आपल्या संपूर्ण टिमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. आज आपल्या सर्वच गुहागर न्यूज चॅनलच्या पदाधिकारी यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐💐💐
-विकास जाधव
५व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा
मी आपला नेहमीचा वाचक आहे. गुहागर न्यूजमुळे गुहागर तालुक्यातील घडलेल्या घटना आम्हाला मुबईत राहुनही माहिती मीळते. त्यामुळे खुप खुप धन्यवाद पुन्हा एकदा शुभेच्छा 💐💐💐💐
-अशोक कांबळे, अध्यक्ष नागेश्वर एकता मंडळ, कांबळेवाडी, दोडवली
गुहागर न्युजच्या वर्धापन दिनास सर्वं टीमला खुप खुप शुभेच्छा.
अतिशय जलद पण योग्य खात्रीशीर बातमी अशी आपली खासियत असून आपली सर्वं टीम अनेक सामाजिक कामामध्ये नेतृत्व करते. आज आपले अनेक वाचक आहेत, अगदी देशाबाहेर सुद्धा. गुहागर तालुका शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, पर्यटन आणि उद्योगीय व्हावा यासाठी आपल्या सारख्या पत्रकार बांधवांचे नेहमीच मोठं योगदान राहिले आहे. यापुढेही आपले न्यूज पोर्टल ह्याच विश्वासावर कायम राहून अधिक वृद्धिंगत होऊ देत यासाठी खुप खुप शुभेच्छा.
-ॲड.सुशील सुगंधा गणपत अवेरे. गुहागर तालुका (G.D.C.&A., M. Com, LL.B., LL.M)
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!
गुहागर न्युज लाइव्ह पोर्टलचे ५ वा वर्धापन दिनानिमित्त सर्व टिमचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
मी गुहागर न्युज बातमी पत्र गृप मधे joined झाल्यापासून अनेक क्षेत्रातल्या बातम्या वाचायला मिळाल्या सर्व क्षेत्रात ही काम करणारे न्यूज चॅनेल आहे आमच्या गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था या सेवाभावी संस्थेच्या अनेक उपक्रमांच्या बातम्या आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण केलेले आहात . या Guhagar News Digital पोर्टलला पुढील वाटचालीसाठी आमच्या संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा. आमच्या संपर्कातील सर्व टिमचे विषेश अभिनंदन.
भविष्यात आपणं live telecast चा शुभारंभ नक्की करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठीही खुप शुभेच्छा!!
“गुहागर न्यूज पोर्टलला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुहागर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक घडामोडींचं वस्तुनिष्ठ आणि झटपट वृत्तांकन करून लोकांचा विश्वास संपादन करणाऱ्या या पोर्टलच्या प्रत्येक सहकाऱ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. ‘वृत्त नव्हे हे न्यायाचे सत्र’ तालुक्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील स्पंदने आपण टिपता. नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडता.
आपली विनयशीलता, चिकाटी आणि तत्परता यामुळेच गुहागर न्यूज पोर्टलने अल्पावधीतच नावारूपाला येऊन असंख्य वाचकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.
सत्याचा जय असत्याचा पराजय या ध्येयवाक्याने कार्यरत राहून नवनव्या उंची गाठाव्यात, हीच सदिच्छा!”
-प्रो डॉ बाळासाहेब लबडे, साहित्यिक
गुहागर न्यूज चॅनल पत्रकारिता क्षेत्रामध्ये केलेल्या दमदार वाटचालीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व यापुढे दैदीप्यमान वाटचालीस साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.गुहागर न्यूज हे बहुआयामी व विविध क्षेत्रातील घटकांना न्याय देणारे अत्यंत दर्जेदार न्यूज चॅनल आहे.गुहागर न्यूज , परिवाराने दखल घेऊन प्रकाशित केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकासात्मक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या वाचायला आम्हाला खूप आवडते .या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
– मनोज पाटील
गुहागर न्यूज पोर्टलला आज पाच वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
सकाळी उठल्यावर पहिल्यांदा वृत्तपत्र वाचनाचा एक मोठा कार्यक्रम असायचा.. मग ते वृत्तपत्र पहिलं कोण वाचणार यावरून वाद.. पण आता प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल त्यामुळे सर्वजण एकाच वेळी बातम्या वाचू शकतात…सर्वात आधी सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर गुहागर न्यूजचे वाचन होते …त्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही..स्थानिक तसेच देश विदेशातील प्रत्येक स्तरावरील माहिती मिळत असते..राजकारण असेल ,शैक्षणिक किंवा व्यवसाय सर्व प्रकारच्या बातम्या या माध्यमातून मिळत असतात…सोशल मीडियावर जरी व्हिडिओ चे माध्यमातून बातमी समजली तरी गुहागर न्यूज कडून वाचायला जास्त आवडत ..आपल्या गुहागर न्यूज ची अशीच भरभराट या पुढे होत राहो…आणि आम्हाला रोजच्या बातम्या या माध्यमातून वाचायला मिळोत ..या साठी आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप सदिच्छा!!!!
-सौ.भक्ती गद्रे, पोलिस पाटील पालशेत.
सन्मा. मयुरेशराव व आपले सहकारी,
आज मला यानिमित्त उल्लेख करावासा वाटतो की, चिपळूण शहरात पहाटे वर्तमानपत्र घरपोच टाकणारी व्यक्ती कै. रामाणे, ओझरवाडी चिपळूण हे काही वर्षांपूर्वी अचानक मयत झाल्यापासून घरपोच वर्तमानपत्र मिळत नाही. परंतू वर्तमान पत्राची जागा गुहागर न्यूज पोर्टल ने भरुन काढली आहे. गुहागर न्यूजच्या माध्यमातून घर बसल्या सर्व माहिती मिळते. आज गुहागर पोर्टल ला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू वजा माझे मित्र व त्यांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
आपण सर्वजण घेत असलेल्या सामुहिक मेहनतीबद्दल आपले खुप खुप आभार.
आपल्या गुहागर न्यूज चॅनलची अशीच उत्तरोत्तर भरभराट होण्यासाठी आपणां सर्वांना सुख-समृद्धिसह निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!
-श्री. अनिल गणपत गोरीवले, शीर- गुहागर/ चिपळूण.
गुहागर न्यूज पोर्टल ला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुहागर न्यूज चे आणि ते चालवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा, घरबसल्या मोबाईल मध्ये एका क्लिकवर देश-विदेशातील तसेच राज्यातील बातम्या बरोबरच जिल्हा, तालुका आणि स्थानिक बातम्याही गुहागर न्यूज मुळे पटकन समजू लागल्या, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, खेळ, आणि इतर सर्व प्रकारातील बातम्यांचे अपडेट यामुळे लगेचच समजू लागले आहेत.
एक नम्र सूचना वजा विनंती आहे की, गुहागर न्यूजने धार्मिक, ऐतिहासिक, किंवा इतर जनजागृती करण्या सारखे असे कोणतेही विषय असतील जे आपल्या धर्म, परंपरा, कुळाचार यांच्याशी निगडित असतील अशा विषयांवर लेख मालिका सुरू करावी.
– अमित जोशी
सर्वप्रथम ‘गूहागर न्यूज पोर्टल’ ला पाचव्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 💐विविध अडचणींवर मात करून या न्यूज पोर्टलने जिद्दीने पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या पुढेही यशस्वी मार्गक्रमण करीत आहे.
साधारणपणे सहा वर्षांपूर्वी आपल्या गुहागरकरांच्या आणि समस्त कोकणवासीयांच्या सहकार्यामुळे मी (मेहेंदळे मोशन पिक्चर्स) ‘संकासूर : कोकणातील एक लोककला’ या माहितीपटाची निर्मिती केली. त्याला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ अवॉर्डही मिळाले.
श्री. मयुरेश पाटणकरजींनी ही डॉक्युमेंटरी फिल्म होळीच्या सुमारास YouTubeवर प्रदर्शित करण्याचं सुचवलं. त्याप्रमाणे ती प्रदर्शित केली. त्यावेळी गुहागर न्यूज पोर्टल अगदी नवीन होतं. या न्यूज पोर्टलने फिल्मला खूप उत्तम प्रकारे प्रसिद्धी दिली. आणि आश्चर्य म्हणजे, पोर्टल नवीन असूनही फिल्म प्रदर्शित केल्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास पाच हजार लोकांनी ती फिल्म पाहिली. यावरून हे पोर्टल भविष्यात प्रचंड यशस्वी होणार हे लक्षात आलं. अर्थात गुहागर न्यूज पोर्टलच्या या यशाचं श्रेय हे संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाला आणि काळानुसार सतत बदलत राहण्याच्या वृत्तीला जातं.भविष्यात गुहागर न्यूज पोर्टल अधिकाधिक यशाचे टप्पे पार करेल, यात शंका नाही.
पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन… 💐🙏🏻😊
-धनंजय वसंत मेहेंदळे, (मेहेंदळे मोशन पिक्चर्स)
आज आपल्या गुहागर न्यूज पोर्टलचा वर्धापन दिन त्याप्रित्यर्थ मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा.
अत्यंत कमी कालावधीत गुहागर न्यूजने मिळविलेला नाव लौकिक निश्चितच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. आपण व आपले सहकारी श्री. मनोजजी व गणेशजी अतिशय उत्तम पत्रकारिता करत आहात. आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून अगदी जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत सामाजिक,सांस्कृतीक राजकीय,शैक्षणिक,वैज्ञानिक,शेती,उद्योग अशा विविध आयामातील विश्वसनीय बातम्या वाचण्याचे समाधान मिळते.
आपल्या या न्यूज पोर्टलचा लौकिक उत्तरोत्तर असाच बहरत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. पुनःश्च एकदा आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
– श्री. चंद्रकांत म. झगडे, अध्यक्ष अ. भा. ग्राहक पंचायत कोकण प्रांत.
Guhagar news च्या यशस्वी पाचव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
मयुरेश पाटणकर व सर्व सहकाऱ्यानचे अभिनंदन!
मुंबई सारख्या शहरात आजच्या धाकाधकीच्या जीवनात पोटापाण्यासाठी वावरत असताना मात्र सकाळी मोबाईल ऑन केल्यानंतर ऑट्स ऑफ वरती दिसणारे guhagar news सदर पाहून मन तिथेच स्थिरावते.
भले मुंबईत असलो तरी गावाकडच्या बातम्या वाचताना गावचे सर्व चित्र डोळ्यासमोर येऊन जाते. एक तर सत्य राजकीय, सामाजिक व गावागावातील मंडळी, मंडळे राबवत असलेले उपक्रम, धार्मिक, सनासूंदीच्या, व राज्यासह अगदी संसदेपर्यंतच्या बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल आपल्या guhagar news च्या सर्व शिलेदारांचं मनापासून अभिनंदन!
आपल्याकडून आमच्या हक्काच्या बातमी पत्राची अशीच प्रगती होत राहो व त्यासाठी आपल्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो.
-गोविंद भिकाजी पागडे (जोगेश्वरी )मुंबई, (मूळ गाव आबलोली )
गुहागर न्यूजला मनःपूर्वक शुभेच्छा!
आम्ही आमच्या गावापासून दूर राहतो, पण गुहागर न्यूजमुळे स्थानिक बातम्यांद्वारे गावाची स्पंदन सतत जाणवतं…. आमचं गावाशी नातं कायम जुळलेलं राहत.
गुहागर न्यूजचे कार्य हे केवळ बातम्या पोहोचवण्याचे नाही, तर गावातील संस्कृती, परंपरा, आणि लोकांचे भावविश्व जपण्याचे आहे. तुमच्या माध्यमातून आम्ही आमच्या मातीच्या गंधाशी आणि स्थानिक घडामोडींशी सतत जोडलेले राहतो. गावातल्या सण-उत्सवांची झलक असो, शेतकऱ्यांच्या अडचणी असोत, की नव्या पिढीच्या यशोगाथा—गुहागर न्यूजने प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवली.
तुमचं हे कार्य आमच्यासाठी एक भावनिक आधार आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! नवीन उपक्रम, अधिक व्यापक कवरेज आणि गावाच्या विकासात तुमचा वाटा अधिक वृद्धिंगत होवो, हीच प्रार्थना. 🤝
-श्री. अजय अनंत मिरगळ, नागझरी, राहणार – ठाणे
गुहागर न्यूज वर्धापन दिन
गाव ठिकाणी चालत असलेल्या घडामोडी राजकीय असो सामाजिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो या मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये पोहोचवण्याचं काम गुहागर न्यूज अतिशय सुंदर प्रकारे करत आहे 💐तरी पुढील वाटचालीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा💐
-निखिल आगरे, ( युवासेना विरार शहर ) गाव वरवेली
मी व माझे मित्रपरिवार गुहागर न्यूजच्या बातम्या रोज वाचतो. तालुक्याबाहेरील बातम्या वाचायला मिळतात तसेच वेगवेगळ्या होणाऱ्या घडामोडी आपल्या न्यूजवरून वाचायला मिळतात. आज गुहागर न्यूजच्या वर्धापन दिनी आमच्या कडून शुभेच्छा 💐👌💐🌹
-संतोष घुमे, असगोली.
आपल्या अनमोल शुभेच्छांबद्दल गुहागर न्यूज टिम आभारी आहे.