वरिष्ठांकडून साथ नाही, सामुहिक राजीनाम्यांची चर्चा
गुहागर, ता. 30 : महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असूनही गुहागर तालुक्याला सत्तेचे पाठबळ मिळत नाही. राष्ट्रवादीला मजबुत करण्यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून साथ मिळत नाही. त्यामुळे गुहागरमधील राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी आणि निराशा आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सामुहिक राजीनामे देण्याची खलबते सुरु आहेत. Guhagar NCP workers are Dissatisfied


गुहागर तालुक्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष बळकटीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रायगड आणि रत्नागिरीमधील दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र शिवाय दिल्लीतील संपर्क यामुळे त्यांना अपेक्षित वेळ गुहागरला देता येत नाही. गेल्या तीन महिन्यात खासदार तटकरे गुहागरमध्ये आलेले नाहीत. त्यापूर्वी साधारणपणे दोन महिन्यातून एकदा ते गुहागरमध्ये यायचे. कार्यकर्त्यांना भेटायचे. मात्र गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर खासदार तटकरेंचा गुहागरमध्ये दौराच झाला नाही. खासदार तटकरें यांनी मंजुर केलेल्या कामांच्या भुमिपुजनाचे कार्यक्रम दिमाखात झाले नाहीत. छोट्या कार्यक्रमांना वरिष्ठ पदाधिकारी येत नाहीत. पक्षबांधणीसाठी जिल्हा पातळीवरुन बळ मिळत नाही. अशा परिस्थितीत पक्ष कसा वाढवायाचा. असा प्रश्र्न येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. Guhagar NCP workers are Dissatisfied


याउलट आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यात दौऱ्यांना सुरवात केली आहे. विविध विकास कामांची भुमिपुजने ते करत आहेत. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचे चेहरे सातत्याने दिसत आहेत. Guhagar NCP workers are Dissatisfied
त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीचा सूर आहे. सत्ता असून कामे होत नसतील. पक्षच बळ देत नसेल तर पदे घेवून काय उपयोग. त्याऐवजी पदांचे राजीनामे द्यावेत म्हणजे पक्षाचे बंधन तरी रहाणार नाही. अशी अनेक कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. हे सर्व कार्यकर्ते एकत्र येवून सामुहिक राजिनामे देण्याच्या तयारीत आहेत. Guhagar NCP workers are Dissatisfied
याबाबत गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या राजकारणामुळे कशा पध्दतीने पक्षवाढीचे काम स्थानिक पातळीवर करायचे. याविषयी अडचणीत आहेत. अशावेळी पद घेवून काम करण्याची मानसिकता उरलेली नाही.