पद्माकर आरेकर जि.प., पं. स. निवडणूकीची तयारी सुरू
गुहागर, ता. 19 : गुहागर राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. सामुहिक राजीनामे असा कोणताही विषय नसुन पक्ष कार्यकर्त्याचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तीगत स्टेटमेंट केले असेल तर तालुका राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम आहेत. अशी माहिती पद्माकर आरेकर, (रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष), यांनी दिली. Guhagar NCP Ready for Election


मध्यंतरी वरिष्ट्र पदाधिकाऱ्यांकडून पाठबल मिळत नसल्याने काही पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ता नंतर गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सामुहिक राजीनामे अशी बातमी पसरविणारी व्यक्ती कोण याचीही चर्चा झाली. काही कार्यकर्त्याकडून याबाबत माहिती घेण्यात आली. तेव्हा असा कोणताही विषय नसल्याचे समोर आले. याबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पद्माकर आरेकर म्हणाले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत. गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संघटना वाढीसाठी काम करत आहेत. अंजनवेल, पालशेत, तवसाळ व वेळणेशवर या चार गटात आढावा बैठका झाल्या आहेत. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांसंदर्भात खासदार सुनिल तटकरे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शनाखाली जि. प. व पं.स निवडणूका लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी केला आहे. या निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळेल असा ठाम विश्वास आहे. सामुहिक राजीनामे असा कोणताही विषय नसुन पक्ष कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तीगत पातळीवर स्टेटमेंट केले असेल तर त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम आहेत. Guhagar NCP Ready for Election


या बैठकीला राजेश बेंडल (नगराध्यक्ष, गुहागर नगरपंचायत), प्रदीप बेंडल (तालुका सरचिटणीस), विजय मोहिते (जिल्हा सरचिटणीस), रामचंद्र हुमणे (माजी तालुका अध्यक्ष), लतीफ लालु (अल्प संख्याक सेल अध्यक्ष), अजीत बेलवलकर (ओबीसी सेल अधयक्ष), गौरव वेल्हाळ (पालशेत गट प्रमुख), वैभवं आदवडे (तालुका उपाध्यक्ष) उपस्थित होते. यांनी दिली. Guhagar NCP Ready for Election
सामुहिक राजीनामे देणार (ही बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)