गुहागर रिक्षाचालक मालक संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
गुहागर, ता. 11 : गुहागर नाका ते आरे पूलापर्यंत रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी गुहागर रिक्षाचालक मालक संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर यांच्याकडे केली आहे. गुहागर वेलदूर रस्त्यावरील गुहागर बाजारपेठ पासून वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले असून रस्त्याची खडी आणि मोठ मोठे दगड वर आले आहेत. तसेच या भागात दुचाकी स्वारांचे अनेक अपघात झालेले आहेत. त्यामध्ये काही माणसे जखमी झाली आहेत. Guhagar Naka to Aare bridge road should be repaired
काही ठिकाणी खड्डे वाचविताना एकाच बाजूने मार्गक्रमण करताना वाहन चालकांची विशेषत: टुव्हीलर चालकांची तारांबळ होते. दू चाकी व तीनचाकी वाहनांचे अपघात होतात. किरकोळ अपघाताचे पर्यवसन वादावादी पासून मारामारीपर्यत होते. रत्याची दुर्दशा याला कारणीभूत असते. गुहागर शहरात प्रामुख्याने रिक्षा व्यवसाय हा जास्त प्रमाणत गुहागर – वरचापाट – बाग आरेगाव असा असल्याने या रस्त्यावरून रिक्षा चालवणे अवघड झाले आहे. यामुळे रिक्षांची वेळोवेळी दुरुस्ती करणेही खर्चिक झाले आहे. तरी त्वरीत सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गुहागर रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर यांच्याकडे करण्यात आली आहे. Guhagar Naka to Aare bridge road should be repaired