गुहागर, ता. 08 : गुहागर नगरपंचायतीच्या 17 प्रभागासाठी आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये 9 जागांवर महिला राज आला आहे. गुहागर नगरपंचायतीचे प्रभाग सोडत शहरातील भंडारी भवन सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी व मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. Guhagar Nagar Panchayat Reservation

या सोडतीसाठी मोठी गर्दी नसली तरी उपस्थितांमध्ये जसजसे आरक्षण जाहीर होत होते तसतसे कोणाचा पत्ता कट याची चर्चा रंगत होती. आरक्षण सोडत मराठी शाळेतील विद्यार्थी पृथ्वी मुंजे, स्वराज गोगाणे व विनय जोशी यांचे हस्ते सोडत काढण्यात आली. यापूर्वीच नगराध्यक्ष आरक्षण झाले होते ते सर्व साधारण महिला पडले आहे यामुळे आता गुहागर नगरपंचायत मध्ये दहा महिला असणार आहेत. Guhagar Nagar Panchayat Reservation

सन 2011 च्या जनगणनेनुसार 5961 मतदार संख्येनुसार नगरपंचायतीच्या प्रभागामधील गेल्या दोन टर्मची रोटेशन पद्धत झाली नाही. सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार या वर्षापासून थेट सोडती द्वारे आरक्षण पद्धत अवलंबण्यात आली. यामुळे प्रथम 17 प्रभागांमध्ये सोडत पद्धतीने पाच नामाप्र साठीचे आरक्षण काढले. या पाच आरक्षणामुळे मधून तीन महिला आरक्षण करण्यात आले. यामुळे पडलेल्या आरक्षणामध्ये. प्रभाग क्रमांक 9, 4, 17 यामध्ये नामाप्र महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या 12 प्रभागांना सर्वसाधारण जाहीर करत यामधून 50 टक्के महिला आरक्षण प्रमाणे सहा सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक 3, 5, 6, 7, 8, 12 या प्रभागांवर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे 17 पैकी नऊ जागांवर महिलाराज तर आठ जागांवर पुरुष उमेदवारासाठी लढत होणार आहे. Guhagar Nagar Panchayat Reservation