डॉ. नातू, चार उमेदवारांचा पराभव वेदना देणारा
गुहागर, ता. 24 : गुहागर नगरपंचायत निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीने भरघोस यश मिळवून आपली सत्ता आणली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे दोन व भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार पराभूत झाले, हा पराभव वेदनादायी आहे. युतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांमुळे हा पराभव झाला आहे. युतीच्या विरोधात काम करणाऱ्या, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई झाली पाहीजे. अन्यथा पुढील काळात युती टिकवणे अवघड होईल. याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. असा इशारा माजी आम. डॉ.विनय नातू यांनी दिला आहे. Guhagar Nagar Panchayat Election
गुहागर नगरपंचायतीवर युतीचा झेंडा फडकवण्यात व भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात डॉ. विनय नातू यांची महत्त्वाची भूमिका ठरली होती. मात्र या निवडणुकीत युती असतानाही बेबनाव झाल्याबद्दल डॉ.नातू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांजवळ बोलताना माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले की, गुहागर नगरपंचायत निवडणूक शिवसेना व भारतीय जनता पार्टी युतीने एकत्रित लढवली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दोन व भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार पराभूत झाले. हा पराभव वेदना देणारा आहे. Guhagar Nagar Panchayat Election
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती असताना शिवसेनेच्या उमेदवाराचा मुलगा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभा होता. हे युतीच्या संकेताला धरून नव्हते. युतीची नियमावली न मानणारी ही घटना होती. त्या वॉर्डांमध्ये एकमेकाला युतीच्या विरोधात मदत करण्याचे काम झाले. मात्र निवडणूक होईपर्यंत युतीमध्ये बेबनाव होऊ नये कार्यकर्ते गप्प होते. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत युतीच्या वरिष्ठांकडे योग्य प्रकारे निरोप पोहोचवला होता. यावर कारवाई होणे आवश्यक होते. मात्र संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नाही. अशा घटनांमुळेच युतीमध्ये बेबनाव वाढत जातो व युतीमधील समन्वय टिकत नाही. Guhagar Nagar Panchayat Election
असा अनुभव गुहागरमधील युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना यापूर्वी आलेला आहे. युतीमधील काही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्याचा फायदे इतर पक्षातले अनेकजण उठवत असतात. याबाबत योग्य वेळी सर्व पदाधिकाऱ्यांना समज देणे गरजेचे असते. युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जे कोण आहेत त्या सर्वांना निर्णयापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. जर योग्य प्रकारे युतीचा समन्वय करण्याची भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवली तरच युतीचे काम समन्वयाने होईल. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई न केल्यास पुढील काळात युती टिकवणे सुद्धा अवघड होईल. याची जाणीव सर्वांनी ठेवण्याचे गरजेचे आहे. याबाबत सर्व अहवाल वरिष्ठांकडे पाठवून देण्यात आलेला आहे. युतीचे जिल्हा पातळीवरील व महाराष्ट्र पातळीवरील सर्व नेते याबाबत योग्य विचार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. Guhagar Nagar Panchayat Election
