गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित
गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धा अंजनवेल हायस्कूल येथे दि. २७/ ९ / २०२३ रोजी घेण्यात आली होती. Guhagar High School Success in Essay Competition

ही निबंध स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीन गटात संपन्न झाली. प्राथमिक गटात कु कार्तिकी सुनिल भोसले प्रथम क्रमांक , उच्च माध्यमिक गटात कु भाग्यश्री चंद्रकांत गुरव द्वितीय क्रमांक तर जान्हवी प्रविण घाडे या विद्यार्थीनीला सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले. विद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थिनींचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे CEO व शाळा समिती अध्यक्ष मा श्री दिपक कनगुटकर साहेब, मा मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ एस एस कांबळे मॅडम, श्री एम एस गंगावणे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच संस्था व शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. Guhagar High School Success in Essay Competition

