गुहागर, ता.18 : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीवनश्री प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच 100 टक्के निकाल लागल्याबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर व त्यांचे सहकारी शिक्षक यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले. Guhagar High School felicitated
यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी विदयार्थ्यांसह शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. शाळेच्या इतिहासात प्रथमच शंभर टक्के निकाल लागला आहे. माजी विद्यार्थी म्हणून याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपण सर्व शिक्षकांनी अशाचप्रकारे शाळेच्या शैक्षणिक विकासात आपले योगदान देत राहा, यासाठी जीवनश्री प्रतिष्ठानचे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. Guhagar High School felicitated
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संचालक सिद्धिविनायक जाधव, माधव ओक, अरुण मालप, गणेश धनावडे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पर्यवेक्षिका सोनाली हळदणकर, मनीषा सावंत, गायत्री कनगुटकर, मधुकर गंगावणे, गुलाब सिंग पाडवी, राधा शिंदे, मिताली पाकळे, मीनल खानविलकर, प्रदीप जाधव, कृपाल परचुरे, ज्योती देवकर, विनायक जाधव, वैभव ढोणे, स्वप्निल कांबळे, जयश्री बाणे, स्वामिनी भोसले, सुचिता ठाकूर, गितांजली सागवेकर आदी उपस्थित होते. Guhagar High School felicitated