• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

5 बिनविरोध सरपंच ठाकरे गटाचे

by Mayuresh Patnakar
December 9, 2022
in Guhagar
359 3
2
Gram Panchayat Election in Guhagar : कोतळूक सरपंच बिनविरोध उमेदवार सौ.प्रगती मोहिते

Gram Panchayat Election in Guhagar : कोतळूक सरपंच बिनविरोध उमेदवार सौ.प्रगती मोहिते

704
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

2 भाजपचे तर 1 राष्ट्रवादीचा बिनविरोध

Guhagar Gram Panchayat Elections Updates, ता. 09 :  तालुक्यातील 21 पैकी 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.  या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची वैयक्तिक जीवनातील राजकीय पार्श्र्वभुमी लक्षात घेतली. त्यावेळी बिनविरोध सरपंच निवडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. 9 पैकी 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, 2 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे, 1 सरपंच राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. एका ग्रामपंचायतीचा सरपंचाने यापूर्वी आरपीआयतर्फे निवडणूक लढविली होती. (Guhagar Gram Panchayat Elections Updates)

https://ayurzeal.com/

मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

संबंधित गावांनी एकत्र बसुन प्रभागातील आणि सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून दिले. त्यामधील आवरे असोरे आणि सडेजांभारी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे त्याच्या वैयक्तिक जीवनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करतात. पोमेंडी गोणवली, मढाळ, वडद येथील निवडून आलेले सरपंच देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी संबंधित आहेत. Guhagar Gram Panchayat Elections Updates

पाली आणि पालकोट तर्फे त्रिशुळ या ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून आलेले सरपंच हे त्यांच्या वैयक्तिक जीवनात भाजपचे काम करतात.

साखरी त्रिशुळ ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेले सचिन म्हसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. 

कोतळूकचे सरपंच पद अनुसुचित जाती, जमाती करीता आरक्षित होते. कोतळूक मधील बौध्दजन सहकारी संघ या सामाजिक संस्थेशी संबधित असलेल्या प्रगती मोहितेंचे नाव तेथील ग्रामस्थांनी निश्चित केले. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. 2007 मध्ये पंचायत समितीची निवडणुक प्रगती मोहिते यांनी आरपीआय मधुन निवडली होती.  Guhagar Gram Panchayat Elections Updates

Tags: GuhagarGuhagar Gram Panchayat Elections UpdatesGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share282SendTweet176
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.