वर्षभरापूर्वी रत्नागिरीमधील नगररचनाकार कार्यालयाने बनविलेला शहराचा सद्यस्थितीदर्शन नकाशा (Existing Land Use) नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असलेल्या काही नोंदींवर नागरिकांनी हरकती घेतल्या. त्याचा अहवाल नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला पाठविला. त्या सर्व हरकतींचा विचार करुन आणि पुढील 25 वर्षांतील लोकसंख्या वाढ लक्षात घेवून त्याप्रमाणात नगरात आवश्यक असलेल्या सोयी सुविधांचा विकास आरखडा (Praposed Land Use) तयार करण्यात आला. हा आरखडा (Guhagar DP) आज सहाय्यक संचालक नगररचनाकार संभाजी मोरे, नगररचनाकार श्रीकांत प्रभुणे यांनी गुहागर नगरपंचायतीकडे सुपूर्त केला. कोणत्याही इमारतीवर आरक्षण नाही. पर्यटनवाढीचा दृष्टीकोन ठेवून आणि सीआरझेड 2 चा विचार करुन हा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. 31 जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करुन हा आराखडा (Guhagar DP) शासनाकडे पोचविण्याची कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाला करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या
नगररचनाकारांनी नगरपंचायतीकडे केला सुपूर्त
जनतेला हवा असलेला विकास आराखडा करा – राजेश बेंडल
शहर भाजपने केली वचनपूर्ती
याबाबतचा हा खास व्हिडिओ पहा.