गुहागर, ता. 19 : गुहागर येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख अशोक चव्हाण यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी गुहागर आगाराचा पदभार स्वीकारला होता. Guhagar depot chief Ashok Chavan transferred

अल्पावधीतच त्यांनी आगाराच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न केले. लांब पल्ल्याच्या अनेक बसफेऱ्या सुरू करून त्यांनी आगाराच्या महसुलात वाढ घडवून आणली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत, मिळून-मिसळून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. मुंबई, ठाणे आणि पनवेल अक्कलकोट, तुळजापूर, या मार्गांवर प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठी विविध वेळांवर बससेवा सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. या गाड्या नियमित आणि सुरळीत चालाव्यात यासाठी त्यांनी नियोजनबद्ध काम केले. Guhagar depot chief Ashok Chavan transferred
दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर गुहागर आगारातील रिक्त पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच आगार पुन्हा बेवारस राहणार का,? अशी चर्चा कर्मचारी वर्गात रंगू लागली आहे. Guhagar depot chief Ashok Chavan transferred