गुहागर, ता. 30 : गुहागर शहर क्रिकेट संघटनेतर्फे प्रथमच गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जहूर वाँरियर्स संघाने विजेते पद, द्वितीय क्रमांक कन्हैया प्ले स्कुल, तृतीय क्रमांक ब्रह्मा वाँरियर्स, तर चतुर्थ क्रमांक गुहागर जिमखाना यांनी पटकावला. Guhagar City Premier League

ही स्पर्धा दि. 27 मार्च ते 29 मार्च रोजी व्याघ्रंबरी मंदिरासमोरील मैदानात पार पडली. या स्पर्धेत मालिकावीर यश लोखंडे, उत्कृष्ट फलंदाज प्रणव देवकर, उत्कृष्ट गोलंदाज विराज लोखंडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंदार मोरे, अंतिम सामन्यातील सामनावीर यश लोखंडे, उगवता तारा रूद्र पावसकर, आर्यन साटले, षटकार किंग यश लोखंडे यांना घोषित करण्यात आले. Guhagar City Premier League

या स्पर्धेसाठी जय मल्हार वॉरियर्स, कन्हैया प्ले स्कूल, गुहागर फायटर्स, ओम साई इलेव्हन, जिजा इलेव्हन, गावदेवी वॉरियर, नरू दादा वॉरियर, गुहागर जिमखाना, ब्रह्म वॉरियर्स व जुहूर वॉरियर्स या सहा या दहा संघाने स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. Guhagar City Premier League
