भाजप कार्यकर्त्यांनी मांडले विकासाचे प्रश्र्न
गुहागर, ता. 24 : गुहागर मधील श्री व्याडेश्र्वर देवस्थान आणि श्री दुर्गादेवी देवस्थानच्या अध्यक्षांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देव दर्शनासाठी गुहागरला येण्याचे आमंत्रण दिले. Trustee invites Deputy CM to Guhagar. यावेळी गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांनीही फडणवीसांची भेट घेवून गुहागरमधील विकासकामांमधील समस्यांची माहिती दिली. Guhagar BJP workers meet Fadnavis
गुहागरमधील श्री व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे आणि दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही देवस्थानच्या अध्यक्षांनी उपमुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ आणि देवस्थानचा प्रसाद देवून सत्कार केला. तसेच देव दर्शनासाठी गुहागरला यावे असे निमंत्रणही दिले. यावेळी दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी कमळ कळीच्या प्रसादाची आठवण फडणवीसांना करुन दिली.
कमळ कळी राज्यात उमलली
2014 च्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दुर्गादेवी मंदिरात महाराष्ट्र काल आज आणि उद्या या विषयावर भाषण केले होते. दुर्गादेवी देवस्थानने त्यांचा कमळ देवून सत्कार केला. त्यावेळी दिलेले कमळ कळीच्या रुपात होते. त्यावर अध्यक्ष किरण खरे यांनी दुर्गादेवीचा प्रसाद म्हणून दिलेली कळी निश्चित फुलेल असे व्यासपीठावरुन सांगितले. त्यानंतर महाराष्ट्रात भाजप सेनेची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. जलयुक्त शिवारच्या कामाची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुहागर दौऱ्यावर आले असता पुन्हा एकदा दुर्गादेवी मंदिरात ते दर्शनासाठी आले. तेव्हा पूर्ण उमललेले कमळ देवून देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. ही आठवण सांगितल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही देवस्थानच्या अध्यक्षांना गुहागरला येण्याचे वचन दिले. Guhagar BJP workers meet Fadnavis
समस्यांवर चर्चा
याच भेटीच्या वेळी गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. गुहागरच्या विकासात अडचणीचा ठरणारा सीआरझेडचा प्रश्र्न, महत्त्वाकांक्षी पाणी योजना, गुहागर विजापूर महामार्गाचे अपुरे काम आणि भुसंपादनातील अडचणी आदी विविध विषयांवर भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांजवळ चर्चा केली. प्रत्येक विषयाची स्वतंत्र निवेदने दिली. या सर्व विषयांमध्ये लक्ष घालण्याचे आश्र्वासन यावेळी भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले.Guhagar BJP workers meet Fadnavis
राजेंद्र फडकेंनी घडवली भेट
बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजन राजेंद्र फडके यांच्यामुळे गुहागरकरांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांना भेटता आले. या भेटीच्या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, जिल्हा सोशल मिडिया संयोजक व व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, नगरपंचायत गट नेते उमेश भोसले, भाजयुमो शहराध्यक्ष मंदार पालशेतकर या पदाधिकाऱ्यांसह केदार खरे, अतुल फडके, अद्वैत गोखले, रवींद्र खरे उपस्थित होते. Guhagar BJP workers meet Fadnavis
फोटोसाठी अथक परिश्रम
सध्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा भेटीत पुष्पगुच्छ स्विकारताना काढलेल्या फोटोंमुळे नेत्यांना नंतर अडचणी येतात. फोटोतील व्यक्ती वादग्रस्त ठरल्यावर त्या नेत्यांवर आरोप होतात. खुलासा करावा लागतो. त्यामुळे नव्या इनिंगमध्ये उपमुख्यमंत्री हार, तुरे, सत्काराच्या वेळी फोटो काढण्याबाबत सावध झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यासोबत सेल्फी काढण्यावर निर्बंध आहेत. फोटो काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे गुहागरातून गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यासोबत फोटोच घेता आला नाही. तेथील यंत्रणेने काढलेले फोटो मिळविण्यासाठी देखील परिश्रम करावे लागले. Guhagar BJP workers meet Fadnavis