माघी गणेशोत्सवानिमित्त गजानन प्रासादिक भजन मंडळाचा उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील खोडदे गणेशवाडी येथे प्रतीवर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दि. 22 जानेवारी 2026 रोजी गजानन प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख 11 जानेवारी 2026 पर्यंत आहे. Group dance competition at Khodde
या जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 11,111/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 7,777 /- रुपये व आकर्षक चषक तसेच तृतीय क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 5, 555/- रुपये व आकर्षक चषक मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. Group dance competition at Khodde
नाव नोंदणीसाठी गणेश साळवी मो. नं. 7887447001/9404760567, संजय साळवी मो. नं. 9702987778, राजेंद्र चव्हाण मो. नं. 9403098719 यांचेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. तसेच या जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धांमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन गणेशवाडी ग्रामस्थांच्या वतीने गजानन प्रासादिक भजन मंडळ खोडदे गणेशवाडी या मंडळाचे अध्यक्ष संदीप साळवी यांनी केले आहे. Group dance competition at Khodde
