ग्रामपंचायत निवडणूक : 303 उमेदवारी अर्ज दाखल
Guhagar News, ता. 02 : तालुक्यातील आवरे असोरे, पाली, पालकोट त्रिशुळ, मढाळ, वडद या 5 ग्रामपंचायती आणि कोतळुक, पोमेंडी गोणवली, साखरी त्रिशुळ येथील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 21 ग्रामपंचायतींमधील निवडणुकीसाठी 303 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरली. (Gram Panchyat Election 2022)
नामनिर्देशन पत्रे भरण्याची मुदत शुक्रवारी (ता.2) संपली. या काळात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी 51 व ग्रामपंचायत सदस्यांच्या 173 जागांसाठी 252 इच्छुक आहेत. सर्वाधिक 106 अर्ज मार्गशिर्ष गुरुवारच्या मुर्हूतावर भरण्यात आले.


Grampanchyat Election 2022
गुहागर तालुक्यातील आरे, आबलोली, कोतळुक, कौंढर काळसुर, खोडदे, चिखली, जानवळे, धोपावे, वरवेली, हेदवी, आवरे असोरे, झोंबडी, पाली, पालकोट त्रिशुल, पांगारी तर्फे हवेली, पोमेंडी – गोणवली, मढाळ, वडद, साखरी त्रिशुळ, सडेजांभारी आणि पाटपन्हाळे या 21 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत.
सरपंच पदासाठी 51 अर्ज
21 ग्रामपंचायतींपैकी कोतळुक, आवरे असोरे, पाली, पालकोट त्रिशुळ, पोमेंडी गोणवली, मढाळ, वडद, साखरी त्रिशुळ या 8 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. येथे प्रत्येकी केवळ एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी सर्वाधिक 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (Gram Panchyat Election 2022)
173 ग्रामपंचायत सदस्यांसाठी 252 अर्ज
निवडणुक होणाऱ्या 21 ग्रामपंचायतींमध्ये 65 प्रभागांमधुन 173 ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी 252 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आवरे असोरे, पाली, पालकोट त्रिशुळ, मढाळ, वडद या गावातील ग्रामस्थांनी सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूकही बिनविरोध केली आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये 13 जागांसाठी 25 इच्छुक आहेत. तर साखरी त्रिशुळ गावात ग्रामपंचायत सदस्याचे 1 पद रिक्त रहाणार आहे. (Gram Panchyat Election 2022)
बिनविरोध होणार का?
गुहागर तालुक्यातील कोतळुक, चिखली व धोपावे या गावात बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु आहेत. 8 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झालेत. एका प्रभागातील निर्णय झाला नाही. अशा कोतळुक, चिखली, धोपावे या तीन ग्रामपंचायती आहेत. संवादातून ग्रामस्थ या ग्रामपंचायती बिनविरोध करणार का याची उत्सुकता सर्वांना आहे. कोतळुक गावात अनेक वर्ष ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सहमतीने निवडून देण्याची परंपरा आहे. यावेळीही सरपंच पदाची जागा बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या 9 जागांसाठी 10 अर्ज आले आहेत. धोपावेमधील सरपंच पदाची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र ग्रामपंचायत सदस्य पदांसाठीची निवडणूक बिनविरोध होईल. त्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. (Gram Panchyat Election 2022)
5 डिसेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. 7 डिसेंबरला दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. त्या दिवशी 303 पैकी किती उमेदवार रिंगणात रहातात, किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात याचे चित्र स्पष्ट होइल. (Gram Panchyat Election 2022)
ग्रामपंचायत निहाय सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्यांची संख्या
आरे (सरपंच पदासाठी 4, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 17),
आबलोली (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 15 ),
कोतळुक (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 10),
कौंढर काळसुर (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 12),
खोडदे (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 15),
चिखली (सरपंच पदासाठी 4, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 10),
जानवळे (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 18),
धोपावे (सरपंच पदासाठी 4, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 10),
वरवेली (सरपंच पदासाठी 2, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 12),
हेदवी (सरपंच पदासाठी 2, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 17),
आवरे असोरे (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7),
झोंबडी (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 13),
पाली (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7),
पालकोट त्रिशुल (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7),
पांगारी तर्फे हवेली (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 15),
पोमेंडी – गोणवली (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 14),
मढाळ (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7),
वडद (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7),
साखरी त्रिशुळ (सरपंच पदासाठी 1, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 6),
सडेजांभारी (सरपंच पदासाठी 3, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 8),
पाटपन्हाळे (सरपंच पदासाठी 6, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 13 जागांसाठी 25),