सदस्य पदासाठी 116 तर सरपंच साठी 30 उमेदवार रिंगणात
गुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी 51 जणांनी नामनिर्देशन पत्रे भरली होती. छाननीमध्ये सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. 9 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले. आता 12 गावात सरपंच पदासाठी निवडणूक होत असून 30 उमेदवार रिंगणात आहेत. 8 गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले. 13 ग्रामपंचायतींमध्ये 58 ग्रामपंचायत सदस्यांसाठी 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Gram Panchayat Election in Guhagar)

9 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध
कोतळूक, आवरे असोरे, पाली, पालकोट त्रिशुळ, पोमेंडी गोणवली, मढाळ, वडद, साखरी त्रिशुळ, या 8 गावातील ग्रामस्थांनी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध केली होती. त्यामध्ये आणखी सडेजाभांरी या ग्रामपंचायतीची भर पडली आहे. त्यामुळे 9 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
12 गावात सरपंच पदासाठी 30 उमेदवार रिंगणात
Gram Panchayat Election in Guhagar: तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवडणूक होत आहे. त्यामध्ये आबलोली, कौंढर काळसूर, खोडदे, चिखली, जानवळे, वरवेली, हेदवी, झोंबडी, या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर आरे ग्रामपंचायतीमध्ये 3, धोपावे (4) पांगारी तर्फे हवेली (3), आणि पाटपन्हाळेमध्ये सर्वाधिक 4 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. Gram Panchayat Election in Guhagar

8 गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध
21 ग्रामपंचायतींपैकी आवरे असोरे, पाली, पालकोट त्रिशुळ, मढाळ, वडद, साखरी त्रिशुळ या 6 गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध केली. अर्ज मार्ग घेण्याच्या दिवशी धोपावे आणि सडेजांभारी या दोन गावातील प्रत्येकी एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली. परिणामी धोपावे व सडे जांभारी गावातील ग्रापंचायत सदस्यांची निवडणूकही बिनविरोध झाली. Gram Panchayat Election in Guhagar
13 ग्रामपंचायतींमध्ये 58 ग्रामपंचायत सदस्यांसाठी 116 उमेदवार
21 ग्रामपंचायतींच्या 65 प्रभागांमधुन ग्रामपंचायत सदस्यांच्या 173 जागांसाठी 252 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. तर 173 पैकी 115 जागा बिनविरोध निवडून आल्या. आता गुहागर तालुक्यात 13 ग्रामपंचायतींमध्ये 58 जागांसाठी एकूण 116 उमेदवार रिंगणात आहेत. 13 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक रंगणार आहे. Gram Panchayat Election in Guhagar

Gram Panchayat Election in Guhagar
आरे ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 2 बिनविरोध झाल्या असून 7 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत.
आबलोली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 6 बिनविरोध झाल्या असून 3 जागांसाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
कोतळूक ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 8 बिनविरोध झाल्या असून 1 जागांसाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कौंढर काळसुर ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 7 बिनविरोध झाल्या असून 2 जागांसाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
खोडदे ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 5 बिनविरोध झाल्या असून 4 जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
चिखली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 8 बिनविरोध झाल्या असून 1 जागांसाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
जानवळे ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 2 बिनविरोध झाल्या असून 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
वरवेली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 5 बिनविरोध झाल्या असून 4 जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 3 जागांसाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एक जागा रिक्त रहाणार आहे. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
हेदवी ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 7 बिनविरोध झाल्या असून 2 जागांसाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
झोंबडी ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 7 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 2 बिनविरोध झाल्या असून 5 जागांसाठी 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
पांगारी तर्फे हवेली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 7 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत.
पोमेंडी – गोणवली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमधील 5 प्रभागातील 13 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 6 बिनविरोध झाल्या असून 7 जागांसाठी 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत.
राजकीय वर्चस्वाची लढाई
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील, वाडीतील समस्या आणि मतभेद यांचा प्रभाव पहायला मिळतो. मात्र यावेळी गावामध्ये देखील पक्षीय राजकारणाची गणिते मांडली जात आहेत. या निवडणुकांनंतर अल्पावधीतच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे गावावर वर्चस्व राहीले तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह असलेला उमेदवार निवडून आणणे सोपे जाईल. त्यामुळे गावपातळीवरही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रीय झालेले पहायला मिळत आहेत. Gram Panchayat Election in Guhagar

जागा रिक्त रहाण्याचे प्रमाण अत्यल्प
यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या आरक्षणाच्या अनेक जागा रिक्त रहात असत. यावेळी मात्र सजग झालेल्या महिलांनी आपली जात पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्याने किंवा जात पडताळणीची प्रक्रिया सुरु केल्याने या जागांवरही महिलांचे उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे 173 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांपैकी केवळ (अंदाजे) 3 जागा रिक्त राहील्या आहेत. हे प्रमाण मागील निवडणुकांपेक्षा अत्यल्प आहे. Gram Panchayat Election in Guhagar
तरुणांचा वाढता सहभाग
यावेळी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणांचा सक्रीय सहभाग पहायला मिळाला. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी झालेल्या वाडीच्या, गावाच्या सभा असतो किंवा आपल्या प्रभागातून आपल्या हक्काचा उमेदवार उभा रहावा म्हणून मित्र मंडळाने घेतलेल्या बैठका असोत त्यामध्ये तरुण आपली भुमिका मांडताना दिसत होते. Gram Panchayat Election in Guhagar

