१३ ते २० मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या रिक्त राहीलेल्या व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या १९ जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १३ मे पासून नामनिर्देशन पत्र मागविण्यात येणार असून गरज भासल्यास ५ जून रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र नामप्र जागेसाठी निवडणूक होणार नाही. Gram Panchayat by-election in Guhagar


गुहागर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या मतदार यादी बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल न झालेल्या, तसेच आपला राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये ग्रामपंचायत आंबेरे खुर्दमधील प – भाग १ मधील सर्वसाधारण, प्रभाग २ व ३ मधील प्रत्येकी सर्वसाधारण स्त्री, ग्रामपंचायत कोतळूक प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री, अनुसूचित जाती, ग्रामपंचायत विसापूर प्रभाग ३ मधील सर्वसाधारण स्त्री, वरवेली ग्रामपंचायतीमधील प्रभाग २ मधील सर्वसाधारण स्त्री, पाली ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग ३ मधील सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री. Gram Panchayat by-election in Guhagar
ग्रामपंचायत भातगावमधील प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री २ जागा, प्रभाग ३ मधील सर्वसाधारण, कोसबीवाडी ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग २ मधील सार्वसाधारण स्त्री, शिवणे ग्रामपंचायत प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती, कोळवली ग्रामपंचायतीमधील प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री, पांगारीतर्फे हवेली प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री, ग्रामपंचायत मढाळमधील प्रभाग ३ मधील सर्वसाधारण स्त्री, साखरी आगर ग्रामपंचायत प्रभाग २ मधील सर्वसाधारण स्त्री, असगोली ग्रामपंचायत प्रभाग २ मधील सर्वसाधारण स्त्री या ग्रामपंचायतीचा सामावेश आहे. मळण ग्रामपंचायतमधील प्रभाग ३ मध्ये नामप्र स्त्री जागा असूनही रिक्त आहे. Gram Panchayat by-election in Guhagar


मात्र आरक्षणामधील निर्णय अजून अनिर्णित असल्याने येथील पोट निवडणूक घेतली जाणार नाही. ५ मे रोजी निवडणूक कार्यक्रमाची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी १३ मे ते २० मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. २३ मे रोजी छाननी, २५ मे पर्यंत अर्ज मागे घेणे व गरज भासल्यास ५ जून रोजी निवडणूकीसाठी मतदान घेतले जाणार आहे. Gram Panchayat by-election in Guhagar