गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात; डॉ. इंदुराणी जाखड, प्रमुख अतिथी
गुहागर, दि. 04 : मुंबई विद्यापीठाच्या मार्च २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन केले आहे. शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात हा समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित राहणार आहेत. Graduation Ceremony in Ratnagiri


डॉ. इंदुराणी जाखड सन २०१६च्या तुकडीच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी उपविभागीय अधिकारी (गडचिरोली); आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीच्या प्रकल्प अधिकारी; गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे. जुलै २०२० पासून त्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. Graduation Ceremony in Ratnagiri
पदवीदान समारंभात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. Graduation Ceremony in Ratnagiri

