ग्रा. पालशेतचा अजब कारभार -माजी उपसरपंच कानिटकर यांचा आरोप
गुहागर, दि.17 : तालुक्यातील पालशेत येथील सुधारित नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये एक वर्षाची गॅरंटी संपलेले दोन पंप बसविण्यात आल्याचा आरोप माजी उपसरपंच श्री. रवींद्र कानिटकर यांनी केला आहे. गेल्या दोन – अडीच वर्षात अनेकदा अनेक ग्रामसभांमधून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार ग्रामस्थांसमोर आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आला आहे. Gra. Strange Karbhar of Palshet


माजी उपसरपंच श्री. रवींद्र कानिटकर यांनी याबाबत ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळविले होते. २४ फेब्रु. २०२२ रोजी बोलाविलेल्या सभेत श्री. कानिटकर यांनी गुजरात उत्पादित पाण्याच्या पंप/मोटर्स बाबतचे अनुभव सांगितले होते. या सभेमध्ये श्रीमती पाटील यांनी सदरचे पंप सहा महिन्यापूर्वी ठेकेदाराने खरेदी केल्याची माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ही खरेदी २६ महिन्यांपूर्वी झाल्याची माहिती श्री. कानिटकर यांनी दिली. हे गॅरंटी संपलेले पंप ग्रामपंचायतीने ही गोड मानून घेतले. Gra. Strange Karbhar of Palshet
दरम्यान, २६ फेब्रु. २०२२ रोजी या योजनेचे ठेकेदार सुनील नायक यांनी कानिटकर यांना म. जि. प्रा. चे विद्युत विभागाचे अधिकारी श्री. बेंडखले यांच्या उपस्थितीत पाणी योजनेच्या विहिरीवर बोलावले. श्री बेंडखले यांच्या प्रश्नावर कानिटकर यांनी गुजरात उत्पादित पंपाबाबत माहिती दिली. २५ फेब्रुवारी रोजी ठेकेदार व श्रीमती. पाटील यांनी दिलेल्या म. जी. प्रा. मान्यताप्राप्त पंप उत्पादक कंपन्याची यादीनुसार नामांकित कंपनीचा पंप खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र आमच्या मान्यताप्राप्त पंप उत्पादक कंपनीकडून खरेदी केल्याची माहिती देण्यात आली. Gra. Strange Karbhar of Palshet
पंपाच्या गॅरंटीबाबत विचारणा केली असता १२ महिने अशी माहिती देण्यात आली. मुळात ३ जाने. २०२० रोजी खरेदी केलेल्या या पंपांची गॅरंटी २ जुलै २०२१ रोजी कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे संपली होती. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी गॅरंटी वाढवून मिळणार असल्याची माहिती दिली. याबाबत खुलासा करताना ठेकेदार सुनील नायक व बेंडखले यांचे गॅरंटी बाबत विभाग व संबंधित कंपनीशी बोलणे झाले असून ठेकेदार एक वर्षाची हमी घेणार आहे. आणि म. जी. प्रा. ग्रामपंचायतीला लेखी स्वरुपात आश्र्वस्त करणार असल्याची माहिती देण्यात आली. Gra. Strange Karbhar of Palshet
पण प्रत्यक्षात पंप उत्पादक कंपनीने गरज भासल्यास पंपाच्या दुरुस्ती कामाचा मोबदला घेऊन पंपाचे काम/दुरुस्ती करून देईल असे सांगून संबंधितांची बोळवण केल्याचे समजते. या सगळ्या हास्यास्पद प्रकारावर कडी म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी श्री. कानिटकर काम करत असलेल्या ठिकाणी झालेल्या भेटी मध्ये सदरचे गॅरंटी बाह्य पंप पालशेतच्या साडेसात कोटींच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेत वापरण्यासाठी श्री. कानिटकर यांनी संमती द्यावी, असा पोरकट आग्रह धरला. श्री. कानिटकर हे ना सरपंच आहेत, ना सदस्य. हा अधिकार सर्वस्वी सरपंच यांचा आहे. याची कल्पना श्री. कानिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. चुकीच्या पद्धतीने केवळ ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी चालविलेले प्रयत्न आणि ग्रामपंचायतीकडून होणारी सोईस्कर डोळेझाक याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. Gra. Strange Karbhar of Palshet
गावाच्या पाणी योजनेत वापरले जाणारे पंप वा कोणतेही साहित्य हे उत्तम दर्जाचे असावे. आणि त्याची खरेदी ही जागरूकपणे होणे अपेक्षित असताना गॅरंटी बाह्य पंप गावाच्या माथी मारून संबंधित ठेकेदार गावाची फसवणूक करत असून ग्रामपंचायत त्याला त्यांची बेफिकिरी निदर्शनास येऊन देखील पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरू आहे. Gra. Strange Karbhar of Palshet

