• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धा

by Guhagar News
March 2, 2026
in Guhagar
28 0
0
Government and Semi-Government Employees Cricket Tournament

गुहागर तालुका संगणक परिचालक संघटना आयोजित क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता पोलीस कर्मचारी संघ गुहागर

55
SHARES
156
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या व्यापातून जरासा विरंगुळा मिळावा याकरिता गुहागर तालुक्यामधील संगणक परिचालक संघटना गुहागर यांच्या वतीने दि. 28 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या एक दिवशीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Government and Semi-Government Employees Cricket Tournament

या स्पर्धेसाठी रोख रक्कम 7001/- व आकर्षक चषक संघटनेच्या वतीने ठेवण्यात आले होते. तर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 5001/- नवनिर्माण पंचायत समिती सदस्य प्रणव दादा पोळेकर यांच्याकडून, मालिकावीर, सामनावीर सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक बक्षीस सुद्धा ठेवण्यात आली होती. महापुरुष पोलीस कर्मचारी संघाने प्रथम क्रमांक पटकवला. तर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने द्वितीय क्रमांक पटकवला. सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून राजेश धनावडे सर्वोकृष्ट गोलंदाज म्हणून सौरभ तर सर्वोकृष्ट फलंदाज म्हणून मुकुंद याची निवड करण्यात आली. Government and Semi-Government Employees Cricket Tournament

Government and Semi-Government Employees Cricket Tournament
गुहागर तालुका संगणक परिचालक संघटना आयोजित उपविजेता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ गुहागर

या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे उपसरपंच श्री असीम शेठ साल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुनील पवार हेही उपस्थित होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातून एकूण आठ शासकीय कर्मचाऱ्यांचे संघान मधून लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सचिव श्री बागुल भाऊ साहेब आणि घेवडे भाऊ साहेब हे उपस्थित होते. संघटनेच्या संघा मधून तालुक्याचे माननीय गटविकास अधिकारी श्री भिल्लारी साहेब यांनी सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतला. Government and Semi-Government Employees Cricket Tournament

या संपूर्ण सामन्याचे आयोजन करताना संगणक परिचारक संघटनेचे अध्यक्ष तारेश हळदणकर, खजिनदार समीर ओक, सल्लागार स्वप्निल आग्रे त्याचप्रमाणे मिलिंद मोहिते,  मयूर दरिपकर, साईश दवंडे यांनी विशेष मेहनत घेतली. तर तालुक्यातील इतर सर्व सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली. ही स्पर्धा कोणतेही वाद विवाद न करता पार पडली.  Government and Semi-Government Employees Cricket Tournament

Tags: Government and Semi-Government Employees Cricket TournamentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.