गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळ शंकर झगडे यांनी गुहागर तालुका खरीप पीक (भात व नागली) स्पर्धा २०२४ मध्ये स्फूर्तीदायक सहभाग नोंदवून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या अथक परिश्रम, अनुभवसंपन्न शेती कौशल्य आणि निसर्गाशी जोडलेल्या नात्याचे हे फलित आहे. Gopal Zagade 2nd in Kharif Crop Competition


श्री. गोपाळ शंकर झगडे यांचे रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे जेष्ठ सदस्य म्हणून त्यांचे योगदान समाजकार्याच्या क्षेत्रातही उल्लेखनीय आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. Gopal Zagade 2nd in Kharif Crop Competition