गुहागर, दि 25 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर शाळेला मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीचे औचित्य साधून मैत्री ग्रुपने शाळेला एलईडी लाईटचे साहित्य दिले. Goodwill visit of Friendship Group

समृद्ध शिक्षणातून उद्याचा बलशाली भारत घडू शकतो. स्पर्धेच्या युगात उत्तम शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. तरच विद्यार्थी आपल्यातील गुणवत्तेला न्याय देऊ शकतो, असे प्रतिपादन मैत्री ग्रुपचे अध्यक्ष गणेश धनावडे यांनी केले. Goodwill visit of Friendship Group

सन 1999 ते 2000 या वर्षाच्या इयत्ता दहावीच्या बॅचने गेल्या सहा वर्षांपूर्वी एकत्र येऊन मैत्री ग्रुपची स्थापन केली. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे ज्या गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले त्या शाळेला त्यांनी एलईडी लाईटचे साहित्य देऊ केले. त्यामुळे वर्गात छान प्रकाश योजना झाली आहे. Goodwill visit of Friendship Group

यावेळी मैत्री ग्रुपचे अध्यक्ष गणेश धनावडे, दिपक सांगळे, सोनल पावसकर यांचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी स्वागत केले. यावेळी उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी केले. Goodwill visit of Friendship Group

 
			
