• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवासाठी गुहागर आगाराचे उतम नियोजन

by Ganesh Dhanawade
September 25, 2023
in Guhagar
171 2
0
Good planning of Guhagar Agar for Ganeshotsav
337
SHARES
962
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चाकरमान्यांच्या परती प्रवासासाठी तब्बल ४०७ जादा गाडया बुक

गुहागर, ता. 25 : गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार सज्ज झाले असून आतापर्यंत आगारातून तब्बल ४०७ गाड्या बुक झाल्या आहेत. Good planning of Guhagar Agar for Ganeshotsav

 दि. २३ सप्टेंबर पासून मुंबई, पुणेसह राज्यातील विविध भागात गुहागर आगारातर्फे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती गुहागरचे आगार व्यवस्थापिका सौ. सोनाली कांबळे यांनी दिली. दोन वर्षाच्या कोविड काळातील अनेक निर्बंधानंतर गेल्यावर्षापासून मुक्तपणे गणेश उसव साजरा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील गणेश भक्त चाकरमानी आपापल्या घरी येऊन पोचले आहेत. ट्रेन, खाजगी ट्रॅव्हल्स, भाड्याच्या किंवा स्वतःच्या कार व एसटीच्या माध्यमातून गणेश भक्तांनी आपल्या घरी हा सण उत्साहात साजरा केला. परंतू, हे करत असतानाच या सर्वांचे लक्ष परतीच्या प्रवासाकडे लागले होते. Good planning of Guhagar Agar for Ganeshotsav

२३ सप्टेंबर पासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, या वर्षी त्यामधे जवळपास तीप्पट गाड्यांची भर पडली असून तब्बल ४०७ जादा गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, विरार, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, बोरीवली, विठ्ठलवाडी, कल्याण अशा विविध मार्गावर या बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या जादा गाडया असल्या तरी कोणत्याही प्रकारचा जादा भार प्रवाशांवर टाकलेला नसून सर्व साध्या दरातील तिकीटात प्रवाशांना सेवा उपलव्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Good planning of Guhagar Agar for Ganeshotsav

बुक झालेल्या जादा गाडया राज्यातील इतर आगारामधून मागविल्या असून आगारातून रोजच्या सुटणाऱ्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या नियोजनावर त्याचा पारिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगारातील वाहक – चालक, कार्यशाळा कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी या सर्वांनी या वाहतूकीचे नियोजन केले असून गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही सौ. कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. Good planning of Guhagar Agar for Ganeshotsav

Tags: Good planning of Guhagar Agar for GaneshotsavGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share135SendTweet84
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.