पालशेत मधील यशची साताऱ्यात होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
गुहागर, ता. 05 : डेरवण येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा अजिंक्यपद धनुर्विद्या (अर्चरी) स्पर्धेत पालशेत येथील कु. यश सुभाष सावंत याने सुवर्णपदक पटकावले. त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यश सावंत याचे क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Gold medal in archery competition to Yash
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील कु. यश सुभाष सावंत याने १९ वर्षीय वयोगटात ५० मीटर अंतराच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेपूर्वी बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या (खुलागट) स्पर्धेचा अनुभव यश याने घेतला आहे. विभागीय स्पर्धेनंतर चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या यशामध्ये प्रशिक्षक श्री. अभिषेक यशवंत पालकर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. Gold medal in archery competition to Yash