प्राथमिक गटात मोनाली गोरीवले, उच्च प्राथमिक गटात शुभम रामाणे प्रथम
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्रीशिवछत्रपती सभागृहात नुकताच गौरव समारंभ संपन्न झाला. हा समारंभ राष्ट्रमातांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटना गुहागर तालुका शाखातर्फे आयोजित केला होता. सदरचा कार्यक्रम कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. Glory to the students by the teachers union


कार्यक्रमाचा प्रारंभ महापुरुष व राष्ट्रमाता यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आला. बुद्ध स्मरणगीत सौ. पवार यांनी सादर केले. तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड यांनी संघटनेतर्फे राबवले जाणारे कार्यक्रम व उपक्रमांची माहिती प्रास्ताविकामधून सांगितली. Glory to the students by the teachers union
या निबंध स्पर्धेतील विजेते तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानपत्र शांताराम चँरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष , मुंबई आयकर विभागातील मासू गावचे सुपूत्र राजेश मासवकर तसेच सन्मानचिन्ह कै. सौ. रत्नमाला रामचंद्र भोजने शिक्षण सहाय्यक संस्था मासूचे अध्यक्ष, मुंबई आयकर विभागातील मासू गावचे सुपूत्र राजेश भोजने यांच्या सहकार्यातून लाभली. Glory to the students by the teachers union


स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा तसेच राजमाता जिजाऊ, राजयोगिनी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आदर्श माता रमाई या राष्ट्रमातांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटना गुहागर तालुका शाखातर्फे गौरव समारंभ नुकताच पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्रीशिवछत्रपती सभाग्रहात नुकताच संपन्न झाला. Glory to the students by the teachers union


यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटने तर्फे प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात कु. मोनाली मिलिंद गोरीवले – शाळा शीर नं. ३ व उच्च प्राथमिक गटात कु. शुभम प्रदीप रामाणे – पालशेत हायस्कूल या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागरतर्फे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शाळा वरवेली नं.२ ता. गुहागरचे शिक्षक श्री. प्रदीप रामनाथ पडवाळ यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक भेट , शाल व पुष्पगुच्छ या स्वरूपात कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे आदर्श शाळा पुरस्कार संपादन केलेल्या जि.प. शाळा वाडदई , जि.प. शाळा वरवेली नं. २ या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचा गौरव करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय अपंग सेवा पुरस्कार संपादन केलेले श्री. सुरेंद्र चिवेलकर , आदर्श शिक्षिका पुरस्कार संपादन केलेल्या सौ. ममता विचारे यांनाही सन्मानित करण्यात आले. Glory to the students by the teachers union
सदरचा कार्यक्रम कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. कार्यक्रमासाठी कोकण विभाग कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश गमरे, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नेते सिद्धार्थ जाधव, रत्नागिरी तालुका अध्यक्ष संजय तांबे, चिपळूण तालुकाध्यक्ष मनोज पवार, गुहागर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. Glory to the students by the teachers union
निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात १४२ व उच्च प्राथमिक गटात १२७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले. निबंध स्पर्धेचे परिक्षण सौ. पवार, सौ. गायकवाड यांनी केले. गट क्रमांक – (इयत्ता पहिली ते पाचवी ) प्राथमिक गटात कु. मोनाली मिलिंद गोरीवले – शाळा शीर नं. ३ – प्रथम क्रमांक, कु. पुजा तृषांत सुर्वे – शाळा खोडदे नं.१ – द्वितीय क्रमांक, कु. अक्षरा वैभव सूर्यवंशी – शाळा वेळणेश्वर नं. १ – तृतीय क्रमांक, तसेच याच गटात उत्तेजनार्थ कु. क्षितिजा किरण सूर्यवंशी – शाळा वेलदुर घरटवाडी व कु. शौर्या मंगेश आंबेकर- शाळा शीर नं. ३ या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. गट क्रमांक – २ (इ. सहावी ते आठवी ) या उच्च प्राथमिक गटात कु. शुभम प्रदीप रामाणे – पालशेत हायस्कूल – प्रथम क्रमांक, कु. अनुष्का अर्जुन बिरादार – आबलोली विद्यालय – द्वितीय क्रमांक व कु. कार्तिकी दिनेश देवळे – शाळा वेळणेश्वर नं. १ हिने तृतीय क्रमांक संपादन केला. याच गटात उत्तेजनार्थ कु. समृद्धी सुरेश आंबेकर – पाटपन्हाळे हायस्कूल, कु. तेजस्वी अमरनाथ मोहिते – पाटपन्हाळे हायस्कूल व कु. शमिका विलास गावणंग – शाळा वरवेली नं.२ अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तू , रोख रक्कम व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. Glory to the students by the teachers union
सदरच्या कार्यक्रमात कोकण विभाग कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश गमरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष संजय तांबे , चिपळूण तालुका अध्यक्ष मनोज पवार, माजी गुहागर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, गुहागर संघटनेचे कोषाध्यक्ष श्री. जाधव, गुहागर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे अध्यक्ष आदींनी मनोगतातून कास्ट्राईब शिक्षक संघटना गुहागर तालुका शाखेच्या उत्तम कार्याबद्दलचा गौरव व्यक्त केला. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी विचारांना उजाळा देण्याचे काम संघटनांच्या कार्यक्रमांतून होत असते. विचार देण्याचे काम कास्ट्राईब शिक्षक संघटना करीत आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेची दखल अधिकाऱ्यांना घ्यावी लागते. १२३८ शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षाबाबत मार्गदर्शन उपक्रम कास्ट्राईब संघटनेने राबविला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या गुहागर तालुका शाखेने सुरू केल्याबाबत गुहागर शाखेचे कौतुक आहे. गुहागर तालुका शाखेचे काम उत्तम आहे असे गौरवोद्गार काढले. Glory to the students by the teachers union