गुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी आयोजित “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “कार्यक्रमानिमित्त “उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीरांचा “या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या प्राथमिक गटातील ऐतिहासिक विषयासंदर्भात निबंध स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच ऐतिहासिक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. Glory to Samrudhi Ambekar by Samant


प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेत “मी किल्ला बोलतोय “या ऐतिहासिक विषयासंदर्भात कु. समृद्धी आंबेकर हिने निबंध सादर केला होता. सदर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते कु. समृद्धी आंबेकर हिला प्रमाणपत्र, रोख रक्कम व पुस्तकरूपी भेट देऊन गौरविण्यात आले. सदरचा गौरव समारंभ नुकताच मार्गताम्हाने हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाला. Glory to Samrudhi Ambekar by Samant


सदर कार्यक्रमासाठी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ. विनय नातू , मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपविभागीय अधिकारी श्री. पवार, चिपळूणचे तहसीलदार श्री. सूर्यवंशी, मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. Glory to Samrudhi Ambekar by Samant