गुहागर, ता. 01 : नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -भारत), साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप) या संस्थातर्फे कोकणातील ज्येष्ठ लोककलावंत आणि विशेष योगदान देणारे कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गुहागर, चिपळूण, संगमेश्र्वर, राजापूर, रत्नागिरी लांजा या तालुक्यातील 30 लोककलावंताना गौरविण्यात आले. Glory to Naman Folk Artists

नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मेटकर हे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विकास (अण्णा) जाधव, महासचिव नितीन जाधव, रविंद्र बावकर, प्रमोद गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कारार्थींना शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. Glory to Naman Folk Artists
गेली 50 वर्ष लोककलेसाठी काम करणाऱ्या जेष्ठ लोककलावंतांना लोककला गौरव 2022 पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये बबन कांबळे (गुहागर), जगन्नाथ शिंदे (गुहागर), दिनेश बुदर (चिपळूण), रमेश गुडेकर (चिपळूण), झराजी वीर (रत्नागिरी), सदाशिव पाले (रत्नागिरी), अंकुश गुरव (लांजा), धनाजी तांबे (राजापूर), सुरेश मांडवकर (राजापूर), नारायण तथा आबा खेडेकर (संगेमेश्र्वर), कृष्णा जोगले (संगमेश्र्वर), या ज्येष्ठ लोककलावंताचा समावेश होता. Glory to Naman Folk Artists

नमन लोककलेचा वारसा पुढे घेऊन चाललेल्या कलावंतांना विशेष गौरव पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले. यामध्ये शिवराम रांजाणे (गुहागर), जनार्दन आंबेकर (गुहागर), सुधीर टाणकर (गुहागर), भिकाजी चोगले (चिपळूण), एकनाथ गुडेकर (चिपळूण), दत्ताराम भेरे (संगमेश्र्वर), दिनेश बांडागळे (संगमेश्र्वर), प्रदिप तथा पिंट्या भालेकर (संगमेश्र्वर), सुर्यकांत धनावडे (रत्नागिरी), गणपत वीर (रत्नागिरी), सुहास साखरकर (लांजा), प्रदिप मिरजोळकर (राजापूर), संतोष बाईंग (राजापूर) या लोककलावंताचा समावेश होता. Glory to Naman Folk Artists
याशिवाय कलाक्षेत्रात कलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल निर्माते, लेखक व दिग्दर्शक संदीप कानसे, शाहीर रामचंद्र घाणेकर, सुरेश चिबडे, प्रकाश पांजणे, मधुकर पंदेरे, कवी विकास लंबोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुकतेच निधन झालेले कानसे ग्रुपचे कलाकार स्वर्गीय अनील घवाळी यांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक विशेष सन्मान करण्यात आला. Glory to Naman Folk Artists

मनोगतादरम्यान सर्वच मान्यवरांनी भविष्यात नमन लोककला संस्थेच्या न्यायीक लढयात आणि लोककलावंताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आश्र्वासन दिले. अध्यक्ष रवींद्र मटकर यांनी मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले. Glory to Naman Folk Artists या सोहळ्याला कला-सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर नमन लोककला प्रेमी, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न. लो. संस्थेचे महासचिव शाहिद खेरटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नमन लोककला संस्थेचे सचिव सुधाकर मास्कर, सतिश (दादा) जोशी, तुषार पंदेरे, उपाध्यक्ष रमाकांत जावळे, सदस्य संदिप कानसे, उदय दणदणे, संगीता पांचाळ-बलेकर, शिवण्याताई मांडवकर, सुभाष बांबरकर, प्रवीण कुलये, अमित काताळे, तालुकानिहाय शाखा कार्यकर्ते आणि साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Glory to Naman Folk Artists

