• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या”

by Guhagar News
August 9, 2025
in Bharat
127 1
0
Give Mahabodhi Mahavihara to Buddhists
250
SHARES
713
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परम पवित्र स्थळी “महाबोधी महाविहार” उभारण्यात आले आहे. जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च  स्थान बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आहे. त्याची विश्वस्त व्यवस्था ही 1949 च्या बी टी टॅक्स  नुसार चालते त्यात चार बौद्ध आणि चार हिंदू ट्रस्टी असून जिल्हाधिकारी चेअरमन असतो. त्यात बदल करून सर्व ट्रस्टी आणि चेअरमन हे बौद्ध असले पाहिजेत, असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्याय  मंत्री  रामदास आठवले यांनी संसदेत भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Give Mahabodhi Mahavihara to Buddhists

Give Mahabodhi Mahavihara to Buddhists

नरेंद्र मोदी यांच्यासोबत रामदास आठवले यांनी दहा मिनिटे चर्चा केली. यावेळी आठवले यांनी पंतप्रधान यांचे सिंदूर ऑपरेशन केल्याबद्दल अभिनंदन केले. रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय स्तरावर  एनडीएचा घटक पक्ष आहे तसाच महाराष्ट्रात महायुतीचा घटक पक्ष आहे. महाराष्ट्रात पब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळत नसल्याची खंत मांडत रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्र सत्तेत वाटा मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच मुंबईत इंदूमील स्थळी वेगाने उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आपल्या हस्ते झाल्याची आठवण  पंतप्रधान यांना  नाम. रामदास आठवले यांनी करून दिली. Give Mahabodhi Mahavihara to Buddhists

Tags: Give Mahabodhi Mahavihara to BuddhistsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.