महिला व आबाल वृद्धांसाठी विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 04 : श्री. घाणेकर नवतरूण सेवा भजन मंडळ पालपेणे मधलीवाडी या मंडळाचा सुवर्णमहोत्सव पालपेणे येथे नूकताच साजरा झाला. या निमित्ताने निराधार लोकांना आर्थिक मदत, पालपेणे शाळा क्रमांक २ ला आर्थिक मदत, शालेय विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा, विविध स्पर्धा, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर हे कार्यक्रम घेण्यात आले. त्याप्रमाणे मंडळाने काढलेल्या स्मरणिकेचा अनावरण सोहळा आनंदात संपन्न झाला. Ghanekar Navatrun Mandal

सुवर्णमहोत्सव कार्यक्रमानिमित्त पहिल्या दिवशी पालपेणे गाव मर्यादित क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जय भवानी क्रिकेट संघ (पालपेणे कुंभारवाडी) विजेता ठरला. तर चिंचवाडी ग्रामस्थ ग्रुप (पालपेणे मधलीवाडी) संघ उपविजेता ठरला. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून विशाल घाणेकर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून सौरभ रघुनाथ घाणेकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहुल मांडवकर यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये १) चिंचवाडी ग्रामस्थ ग्रुप २) आदर्श ग्रुप श्री. फराराबाबा क्रिकेट संघ ३) फाईव्ह ग्राडन क्रिकेट संघ(बाविवरची वाडी) ४ चिंचवाडी मुबंई ग्रुप ५) जय भवानी क्रिकेट संघ (पालपेणे कुंभारवाडी) ६)प्रवीण स्टार क्रिकेट संघ (मधलीवाडी) ७)किंग्ज इलेव्हन (मधलीवाडी) ८) श्री. विठ्ठल रुक्मिणी क्रिकेट संघ (तळ्याचीवाडी) या संघांचा समावेश होता. Ghanekar Navatrun Mandal

दुसऱ्या दिवशी श्री खेमवरदान मंदिरात ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री गणेश मंदिर येथून सन्मानाने ध्वज मिरवणूक काढण्यात आली. ह्या मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज देखावा, विठुरायाचा गजर करणारी दिंडी, कोकणचे खेळे हे देखावे सादर करण्यात आले होते. श्री. फराराबाबा मंदीर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मंडळाचे ग्रामस्थ, मुंबई आणि महिला अध्यक्ष ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, नवीन संकल्पनेची गुढी उभारून मंडळाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सुवर्णमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आणि नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ७० ग्रामस्थांनी नेत्र चिकित्सा शिबीरामध्ये सहभाग घेतला. Ghanekar Navatrun Mandal
महिलांसाठी संगीत खुर्ची व खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा ह्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्चीमध्ये प्रमिला प्रकाश घाणेकर, अपूर्वा प्रवीण घाणेकर, प्रणाली अर्जुन घाणेकर या विजयी झाल्या. पैठणीचा खेळात साधना नरेश घाणेकर व दिपाली सुरेश घाणेकर यांनी पैठणीची बहूमान पटकावला. मुलांमध्ये संगीत खुर्ची खेळात विराज विकास घाणेकर विजयी झाला. ह्या खेळांचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया शैलेश घाणेकर यांनी केले होते. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्राचार्य श्री सुनील देवरे सर (नागोठणे, जि. रायगड) यांचे संघटनेची बांधणी, भविष्यातील वाटचाल, आणि पायाभरणी ह्या मुख्य विषयावर व्याख्यान झाले. याच कार्यक्रमात मंडळातील सर्व कुटुंबांचा सन्मानिका देऊन सन्मान करण्यात आला. Ghanekar Navatrun Mandal
तिसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. पूजेसाठी महाआरती, सूर संगीत भजन कला ह्यांच्या साहित्य पूजन सोहळा भजनी बुवा श्री. पांडुरंग बुवां आणि श्री. राजेश बुवा यांच्या हस्ते पार पडला आणि सर्व भजन प्रेमीच्या उपस्थितीत सूर संगीत भजन सादर करण्यात आले. त्यानंतर मंदिरातुन पूजन करून आणलेले ध्वज यांचे जल्लोषात मंदिरा भोवताली प्रदक्षिणा घालून रामचंद्र घाणेकर, भिवाजी घाणेकर, गणेश घाणेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक श्री. फराराबाबा मंदिराच्या घुमटावर चढविण्यात आला. Ghanekar Navatrun Mandal
मंडळाचा ५० वर्षाचा सुवर्णकाळ संघटीत करून स्मरणिकेमार्फत जतन करून पुढील पिढी करता प्रेरणादायी स्मरणिका तयार करण्यात आली. या स्मरणिकेचा अनावरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी १९७२ स्थापना समिती सदस्य- गणपत पांडुरंग घाणेकर, शिवराम गणपत घाणेकर, सखाराम धाकटू घाणेकर, यशवंत गणपत घाणेकर, रत्नाकर भागोजी घाणेकर, तसेच विद्यमान समिती ग्रामस्थ अध्यक्ष- रघुनाथ देवानंद घाणेकर, मुबंई अध्यक्ष- संदेश विठ्ठल घाणेकर उपस्थित होते. Ghanekar Navatrun Mandal

सुहासिनींच्या सन्मानाकरीता हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. बहुमान लेकींचा… हा सन्मान देऊन ८९ माहेरवाशिणीना गौरविण्यात आले. यामध्ये पैठणीचा खेळात विजयी सौ. मनस्वी गुळेकर (प्रमिला पांडुरंग घाणेकर) ह्या माहेरवाशीणिने बहुमान मिळवला. त्यानंतर भजनी बुवा पांडुरंग कामा घाणेकर आणि राजेश गोविंद घाणेकर यांच्या सुमधुर आवाजात भजन सादर करण्यात आले. Ghanekar Navatrun Mandal
सुवर्णमहोत्सवाच्या मुख्य सभेत व्यासपीठावर
व्यासपीठ अध्यक्ष – श्री.रघुनाथ देवानंद घाणेकर (उपसरपंच पालपेणे, अध्यक्ष- श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ, सौ. योगिता योगेश पालकर(सरपंच पालपेणे), श्री. संदेश विठ्ठल घाणेकर(अध्यक्ष-श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ(मुंबई), सौ. सेजल संजय घाणेकर-(अध्यक्षा- श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ- महिला), श्री. सुनील पांडुरंग घाणेकर ( माजी अध्यक्ष- श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ(मुंबई), श्री.सूर्यकांत दौलत घाणेकर-श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ(ग्रामस्थ), सौ. अश्विनी विनोद घाणेकर-(माजी अध्यक्षा महिला) श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ, श्री.पांडुरंग कामा घाणेकर-भजनी बुवा/ सल्लागार (श्री. घाणेकर नवतरुण सेवा भजन मंडळ(मुंबई), हासबे सर- मुख्याध्यापक(न्यू वरदान स्कुल पालपेणे), समजिस्कर गुरुजी- मुख्याध्यापक मराठी शाळा क्रमांक-२, संजय पालकर- तंटामुक्ती समिति अध्यक्ष-पालपेणे, दिपक साटम – तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष पालपेणे, सुधीर टाणकार-पालपेणे प्रीमियर लीग, अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते- पालपेणे, अरविंद पालकर (गुरुजी)- सामाजीक कार्यकर्ते पालपेणे, वैभव आदवडे- चेरमेन (वि.स.सोसायटी पालपेणे, सिने नाट्य दिग्दर्शक/ कलाकार- मधुकर सोलकर, गणेश किरवे- पत्रकार, पालपेणे गावचे मानकरी-(शिवराम मांडवकर, शैलेश घाणेकर, पांडुरंग टाणकार,सुदाम पालकर, सुरेश मांडवकर), मनोहर पवार गुरुजी- माजी मुख्यध्यापक शाळा क्रमांक -२, विजय महाडिक – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती क्रमांक -२, विनायक अनंत घाणेकर-उपअध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती क्रमांक -२, पालपेणे ग्रामपंचायत सदस्य- दिपील पाष्टे, सुवर्णा महाडिक, संतोष पडवेकर, संतोष मांडवकर, राधिका पालकर, नंदिनी खोचाडे, कीर्ती टाणकार), उपस्थित होते. यावेळी पालपेणे गावातील २१ मंडळे, खेळ्यामधील कलाकार, मंडळातील महिला पुरुष, स्थापना समिती, माजी अध्यक्ष यांचा मंडळा तर्फे सन्मान करण्यात आला. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश सिताराम घाणेकर यांनी केले. Ghanekar Navatrun Mandal
रात्री श्री साई श्रद्धा नमन मंडळ (काणसे ग्रुप) यांचे नमन आयोजित केले होते. ह्यावेळी ३ ते ४ हजार प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आंनद घेतला. अश्या प्रकारे कार्यक्रमची सांगता झाली.
