गुहागर, ता. 12 : पंचायत समिती गुहागरची सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाची आमसभा दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी श्री. पुजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही आमसभा आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी गुहागर तालुकावासीयांनी आमसभेला उपस्थित रहावे. असे आवाहन गटविकास अधिकारी गुहागर यांनी केले आहे. General Meeting of Guhagar on 9th September

पंचायत समितीची आमसभा म्हणजे गावागावातील प्रलंबित विकास कामांमधील अडथळे सोडविण्याचा राजमार्ग असतो. आमसभेमध्ये शासनाच्या प्रत्येक खात्याचा अधिकारी उपस्थित असतो. सामान्य जनतेने दिलेल्या निवेदनाला उत्तर देणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. एकाच ठिकाणी सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित असल्याने एखाद्या प्रलंबित विकास कामातील अडथळे आमसभेमध्ये चटकन दूर होतात. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार असल्याने अधिकाऱ्यांना उडवाउडवीची, दिशाभुल करणारी उत्तरे देता येत नाहीत. कारण आमसभेतील प्रत्येक विषयाचा आढावा त्यानंतर थेट आमदार घेतात. त्यामुळे आमसभा म्हणजे दिर्घकाळ चालणारी, शेकडो निवेदनांवर चर्चा होणारी असे चित्र असते. General Meeting of Guhagar on 9th September
तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे की, आपली निवेदने लेखी स्वरुपात पंचायत समिती कार्यालयाकडे दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५ प्रतीत सादर करावीत. तसेच सदर दिवशी नागरिकांना आपले प्रश्न समक्ष देखील मांडता येतील, असे आवाहन शेखर शा. भिलारे, आमसभा सचिव तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांनी केले आहे. General Meeting of Guhagar on 9th September