• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रा. गोनबरे यांच्या कथासंग्रहाला “गावगाडा” पुरस्कार प्रदान

by Ganesh Dhanawade
June 1, 2022
in Ratnagiri
19 0
0
Gavgada Award to Prof. Gonbare
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण, ता. 01 : येथील प्रा. संतोष गोनबरे यांच्या “माकडहाड डाॅट काॅम” या कथासंग्रहाला या वर्षीचा गावगाडा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. आभरान या कादंबरीमुळे महाराष्ट्राला परिचित असलेले ज्येष्ठ कादंबरीकार पार्थ पोळके यांच्या हस्ते कोथरूड पुणे येथे या पुरस्कारांचे वितरण झाले. ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. Gavgada Award to Prof. Gonbare

यंदाचे या पुरस्काराचे ११ वे वर्ष आहे. विश्वकर्मा तरुण मंडळ वडशीवणे ता. करमाळा या संस्थेच्या माध्यमातून आणि संस्थापक कवी सोमनाथ टकले यांच्या प्रयत्नातून हा पुरस्कार दिला जातो. मराठी मधील तीन दर्जेदार ग्रंथांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी प्रा. संतोष गोनबरे, डाॅ. सुनिता बोर्डे, कादंबरीकार हरिश्चंद्र पाटील यांच्या साहित्यकृतींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Gavgada Award to Prof. Gonbare

प्रा. गोनबरे हे साहित्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. मसाप चिपळूण शाखेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. कथा, कविता, नाटक असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. सहा नाटके, चार एकांकिका, एक कथासंग्रह, एक कविता संग्रह आणि प्रकाशनाच्या वाटेवर असणारा कथासंग्रह अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. मराठीत वेगळा आकृतीबंध मांडून प्रखर सामाजिक भाष्य करणाऱ्या माकडहाड डाॅट काॅम या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्रातील अनेक मान्यवर समीक्षकांनी गौरवले आहे. Gavgada Award to Prof. Gonbare

गोनबरे यांच्या यशाबद्दल प्रकाश देशपांडे, अंजली बर्वे, धीरज वाटेकर, आसावरी देशपांडे जोशी, मंदार ओक, प्रज्ञा इंगवले, प्रकाश घायाळकर, राष्ट्रपाल सावंत, अरुण इंगवले, सुनील खेडेकर, प्राची जोशी, माधुरी पोटे, अभिजित देशमाने आदींनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. Gavgada Award to Prof. Gonbare

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.