गुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्ते कै. सुशील वेल्हाळ यांचे सुपुत्र गौरव वेल्हाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रत्नागिरी-पाली येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. Gaurav Velhal joins Shiv Sena along with his workers
कै.सुशील वेल्हाळ यांनी आपल्या सामाजिक कार्यातून गुहागर तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला कायमस्वरुपी साथ देऊन त्यांनी येथे संघटनात्मक बांधणी केली होती. त्यांच्या पश्चात सुपुत्र गौरवनेही त्यांना साथ दिली. आज गौरव वेल्हाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी जि. प. व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश गौरव वेल्हाळ यांच्यासाठी राजकीय टर्निंग पाँईंट ठरला आहे. Gaurav Velhal joins Shiv Sena along with his workers

वेशकर्त्यांमध्ये वेल्हाळ यांसह प्रशांत भुवड, प्रमोद भुवड, वैभव आदवडे, अजित बेलवलकर, संदीप मांडवकर, दीपक कदम, वैभव वेल्हाळ, नंदकुमार पालकर, पिंट्या वेल्हाळ, अभिजित वेल्हाळ, सुनील बेंद्रे, गणेश मोरे, आकाश जाधव, सुरज बेंद्रे, राजेंद्र भोजने, अवधूत वेल्हाळ, मोहसीन मालगुंडकर, साहिल बेल्हाळ, प्रित वेल्हाळ, आर्या बेल्हाळ यांचा समावेश आहे. Gaurav Velhal joins Shiv Sena along with his workers
यावेळी गौरव वेल्हाळ म्हणाले की, माझे प्रेरणास्थान असलेले माझे वडील आणि सर्वांसाठी आप्पा म्हणून परिचित असलेले सुशील वेल्हाळ यांच्या कामाची पद्धत केवळ गुहागर मध्ये नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यात त्यांना ओळखणाऱ्या अनेकांना जवळून माहित आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री आणि नेते यांच्याशी आप्पांची चांगली गट्टी असल्यामुळे तालुका आणि शहरातील सामाजिक आणि विकासाची कामे करताना त्यांना कोणती अडचण आली नाही. त्यांचा हा सगळा प्रवास जवळून पाहणाऱ्या नेत्यांपैकी विद्यमान उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब हे देखील आहेत. एवढी वर्ष आम्ही दुसऱ्या पक्षात असतानाही सामंत साहेबांनी घरचे संबंध कायम अबाधित ठेवले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार बदलाचा भाग म्हणून त्याचप्रमाणे परिसरातील विकास कामांना अधिक वेगाने बळ मिळण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात जाऊन जास्तीत जास्त कामे करून घ्यावेत आणि आपल्या मनाप्रमाणे स्वर्गीय आप्पांचे स्वप्न पूर्णत्वास न्यावे या विचारातून आज माझे मार्गदर्शक माननीय उदय जी सामंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेत दाखल झालो आहे. पक्षांतर केले असले तरी गुहागर मधील विकासाच्या संदर्भातील माझे व्हिजन आहे तेच राहील. आजपर्यंतच्या प्रवासात जशी स्वर्गीय आप्पांना साथ दिली तशीच साथ आणि तुमच्या आशीर्वाद मला अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. Gaurav Velhal joins Shiv Sena along with his workers
