गुहागर, ता. 11 : तालुक्यातील हेदवी उप डाकघर येथे पोस्टल वित्तीय समायोजन मेळावा पार पडला. या मेळाव्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी पोष्ट ऑफीसच्या सर्व योजनांची माहिती डाकघर निरीक्षक व गुहागर सब डिव्हीजन यांनी ग्राहकांना समजावून सांगितली. Gathering concluded at Hedvi Post Office
तसेच पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनकडून विविध योजनांची काँउटर उघडून नविन खाती व पोस्टल इन्शुरन्सचे काम करण्यात आले. यावेळी सुमारे चार लाखचा व्यवहार झाला. जनतेने बचत कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अश्या मेळाव्यातून खेड्या पाड्यातील व आजुबाजुच्या परीसरामध्ये आर्थिक नियोजनाबाबत जागृती होताना दिसत असल्याचे डाकघर निरीक्षक यांनी सांगितले. Gathering concluded at Hedvi Post Office
या मेळाव्याला हेदवी येथील उपसरपंच बसणकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुर्वे, वेलोंडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी हेदवी पोस्ट मास्तर रावळकर यांनी हेदवी उपस्थित सर्व ग्राहकांचे आभार मानले. Gathering concluded at Hedvi Post Office