• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सिलेंडर चोरट्यांचा धुमाकूळ

by Guhagar News
April 9, 2026
in Guhagar
82 1
0
Gas Cylinder Theft
161
SHARES
459
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सात घरांतून  सिलेंडर चोरले

गुहागर, ता. 09 : तालुक्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील विविध भागांतील वेगवेगळ्या घरांतून तब्बल सात गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Gas Cylinder Theft

स्थानिक नागरिकांच्या मते गॅस सिलेंडरचा वाढता तुटवडा पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील अस्थिर परिस्थिती यामुळे सिलेंडरला बाजारात मागणी वाढली आहे.  त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी नव्या पद्धतीने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला आहे. Gas Cylinder Theft

गुहागर तालुका ग्रामीण तालुका असल्याने सामान्यपणे सिलेंडर हे पडवीत ठेवले जातात. पडवी बंदिस्त नसल्याने पडवील कोणत्याही वस्तू सहज कोणीही नेऊ शकतो. मात्र आजवर पडवीतील वस्तू कोणी चोरल्या नव्हत्या.  आज युद्धजन्य परिस्थितीमुळे भरलेल्या सिलेंडर बरोबरच रिकाम्या सिलेंडरचेही मुल्य वाढले आहे. त्यामुळेच रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराबाहेर पडवीत किंवा स्वयंपाक घराच्या मागील बाजूस ठेवलेले गॅस सिलेंडर हेरून ते पळवले. काही घरांमध्ये तर रिकामा आणि भरलेला सिलेंडर यातील फरक न करताच चोरट्यांनी हाताशी लागेल तो सिलेंडर उचलल्याचेही समोर आले आहे. या घटनांमध्ये एक दोन नव्हे तर सात सिलेंडर वेगवेगळ्या घरातून चोरीला गेल्याने ही साधी चोरी नसून पूर्वनियोजित टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांनी सकाळी उठल्यानंतर सिलेंडर जागेवर नसल्याचे पाहून धक्का बसला आहे. Gas Cylinder Theft

 गॅस सिलेंडर चोरीच्या या प्रकारामुळे गुन्हेगारीचे स्वरूप अधिकच चिंताजनक होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. Gas Cylinder Theft

Tags: Gas Cylinder TheftGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.