गुहागर, ता.30 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाईन गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ या कालवधीत इच्छुकांनी स्वत:समवेत आपल्या घरातील सजावटीची तीन छायाचित्र आणि एक ते दिड मिनिटांचा व्हिडिओ (वेगवेगळ्या अँगलमध्ये ] काढून पाठवावीत. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही. Ganeshotsav Decoration Competition

या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, मोबा. ८९७५३४८१२३, दोडवली शाखा अध्यक्ष सुरेंद्र निकम मो. ९०५७०२६५६५ , आरे शाखा अध्यक्ष रितेश कळझुनकर ८१०४३६०६७४, भातगाव शाखा अध्यक्ष अविनाश वाघे ९५e४४२९२१७, रुपेश बारगोडे ८९७६८९२०२२ यांच्याकडे वरील छायाचित्र आणि व्हिडिओ पाठवावीत. Ganeshotsav Decoration Competition

या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसुन प्रथम पारीतोषिक २ हजार २२२ रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक १ हजार ५५५ रु. व सन्मानचिन्ह, तृतीय पारीतोषिक १ हजार १११ रु. सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ ५५१ रु. व सन्मानचिन्ह तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी केले आहे. Ganeshotsav Decoration Competition